________________
क्लेश रहित जीवन
असतात; पण ही जुनी म्हातारी माणसे परंपरांना चिकटून बसतात. अरे, जगाबरोबर बदलत रहा, नाही तर मार खाऊन मरशील! जगाबरोबर एडजस्ट होता आलेच पाहिजे. मी चोराबरोबर, खिसेकापूबरोबर, सगळ्यांबरोबर एडजस्ट होऊ शकतो. चोराशी मी बोललो तर त्यालाही जाणवते की हे करुणामय आहेत. मी चोराला 'तू चुकीचा आहेस' असे म्हणत नाही. कारण तो त्याचा दृष्टीकोन आहे. लोक त्याला नालायक म्हणून शिव्या देतात. तेव्हा हे वकील लोक काय खोटारडे नाहीत ? साफ खोटी केस असेल तरी मी जिंकून देईन असे म्हणतात, मग ते लबाड नाहीत का ? तुम्ही चोराला धूर्त म्हणता, मग या खोट्याचे खरे करणाऱ्यांवर विश्वास का ठेवायचा ? तरी सुद्धा त्यांचे पण चालतेच ना ? म्हणून आम्ही कोणालाही चुकीचे म्हणत नाही. तो त्याच्या दृष्टीकोनातून बरोबरच आहे. पण आम्ही त्याला खरी गोष्ट समजावून सांगतो की, तू चोरी करतोस त्याचे फळ तुला काय मिळेल.
३८
ही म्हातारी माणसे घरात आली की म्हणणार, ‘हे लोखंडाचे कपाट ? हा रेडियो ? हे असेच का ? हे तसेच का ? अशी प्रत्येक गोष्टींवर टिप्पणी करणार? अरे, एखाद्या तरुणाशी मैत्री कर. हे जग तर सतत बदलतच राहणार. त्याशिवाय हे कसे जगू शकतील? काहीतरी नवीन पाहिले की मोह होतो. नवीन नसेल तर जगतील कसे ? अशा नव्या गोष्टी अनंत आल्या आणि अनंत गेल्या. त्यात तुम्ही ढवळाढवळ करायची नसते. जे तुम्हाला आवडत नसेल ते करू नका. हे आईस्क्रीम तुम्हाला आवडत नसेल तर नका खाऊ. ते थोडेच तुमच्या मागे लागले आहे, 'मला खा, मला खा म्हणून. ' तुम्हाला नाही खायचे तर नका खाऊ. ही म्हातारी तर त्याचा तिरस्कार करतात. हे जे काही मतभेद होतात ते नव्या पिढीला समजून न घेतल्यामुळेच होतात. नवीन पिढी त्यांच्या पिढीनुसारच वागणार. मोह म्हणजे नवीन नवीन गोष्टी उत्पन्न होतात आणि नवीन नवीन दिसत राहते. आम्ही लहानपणापासूनच बुद्धीने खूप विचार करून समजून घेतले की हे जग उलट होत आहे की सुलट होत आहे, आणि