________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
३७
नाही. काय कारण? कारण त्याचा गुणधर्मच काळे पडणे हा आहे. म्हणून मौनच राहायचे. चित्रपटातील एखादे नावडते दृश्य आले तर आपण चित्रपटगृहातील पडदा फाडतो का? नाही ते दृश्य पण बघायचे. सगळेच सिन्स आवडतील असे थोडेच असते? काही जण तर थियेटरमध्ये बसून
ओरडतात. 'अरे, तो मारून टाकेल, तो मारून टाकेल!' जणू हे सगळे दयेचे पुतळेच आलेत! हे सर्व तर पाहायचे आहे. खा, प्या, बघा आणि मजा करा!!
...स्वतःलाच सुधारण्याची गरज प्रश्नकर्ता : काही मुले शिक्षकांना उलटून बोलतात, ती कधी सुधारतील?
दादाश्री : जो चुकांचे परिणाम भोगतो त्याचीच चूक. या गरुंचीच योग्यता नसेल म्हणून शिष्य उलटून बोलतात. ही मुले तर समजदारच आहेत; पण गुरु आणि आई-वडीलच चक्रम आहेत! आणि मोठी म्हातारी माणसे जुन्या गोष्टींना चिकटून बसतात, मग मुले उलटून बोलणारच ना? आजकालच्या आई-वडिलांचे चारित्र्यबळ कमी झाले आहे म्हणून मुले अशी वागतात. आचार, विचार, आणि उच्चार यात जर सकारात्मक बदल घडवता आले तर तुम्ही परमात्मा बनू शकता आणि नकारात्मक बदल घडले तर तुम्ही राक्षसही बनू शकता.
लोक समोरच्याला सुधारण्याच्या प्रयत्नात सगळेच मोडून टाकतात. आधी स्वतः सुधरेल तर दुसऱ्यालाही सुधारू शकेल. पण स्वतःला सुधारल्याशिवाय समोरची व्यक्ती कशी सुधरेल? म्हणून प्रथम आपली बाग सांभाळा मग दुसऱ्यांच्या बागा बघायला जा. स्वतःची बाग सांभाळली तर फळे-फुले मिळतील.
ढवळाढवळ नाही, 'एडजेस्ट' होण्यासारखे आहे संसाराचा अर्थच समसरण मार्ग, त्यामुळे त्यात सतत परिवर्तन होत