________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
प्रकृती ओळखून, सावध राहावे पुरुष प्रसंग विसरून जातात पण स्त्रिया मात्र आयुष्यभर त्या प्रसंगाची मनात नोंद करून ठेवतात. पुरुष भोळे असतात, मोठ्या मनाचे असतात, सरळ असतात, ते बिचारे सगळे विसरून जातात. स्त्रिया तर बोलून सुद्धा दाखवतात की, 'त्या दिवशी तुम्ही मला असे बोलले होते, ते माझ्या काळजात कोरले गेले आहे.' अरे, वीस वर्ष होऊन गेली, अजूनही ती नोंद ताजीच!! मुलगा वीस वर्षाचा होऊन गेला, लग्न करण्याएवढा झाला तरीही ती गोष्ट जपून ठेवलीस?! सगळ्या वस्तू सडतात पण यांची वस्तू मात्र सडली नाही! स्त्रीला जर आपण काही (दुःख) दिले असेल तर ती अस्सल जागी जपून ठेवते, काळज्याच्या आत, म्हणून काही देऊच नका. चुकूनदेखील (दुःख) देण्यासारखे नाहीच, सावध राहण्यासारखे आहे.
म्हणून शास्त्रात सुद्धा लिहिलेले आहे की, 'रमा रमाडवी सहेली छे, विफरे महामुश्केल' (स्त्रीला खेळवणे सोपे आहे पण एकदाची का ती संतापली मग तिला सांभाळणे महा कठीण आहे!) ती संतापली तर काय कल्पना करेल ते सांगू शकत नाही. म्हणून स्त्रीचा वारंवार अपमान करू नका. भाजी गार का? आमटीची फोडणी बरोबर नाही, अशी कटकट कशाला करतोस? वर्षातून एखाद्या दिवशी एखादा शब्द असेल तर ठीक आहे. हे तर दररोजच! 'भाभो भारमा तो बहु लाजमा.' सासरा मान-मर्यादेत तर सून पण सासऱ्याचा आदर राखते. आपण आपल्या मान-मर्यादेत राहायला हवे. आमटी चांगली झाली नसेल, भाजी गार झाली असेल, तर ते नियमाच्या आधारे आहे. आणि फारच झाले तर कधीतरी हळुवारपणे सांगावे की, 'ही भाजी रोज गरम असते, तेव्हा खूप छान लागते.' अशा पद्धतीने सांगितले तर तिला आपल्या सांगण्यामागचा हेतूसमजेल.
व्यवहार येत नसेल तर दोष कोणाचा? अठराशे रुपयांची घोडी घेतली, मग भाऊ घोडीवर बसतो.