________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
भांडण पण झाले नाही. घरात पण असे ठरवले होते की, एवढ्याच पैशाने घर चालवायचे, धंद्यात जरी लाखो रुपये कमावले, पण हे पटेल (स्वतः दादाश्री) सर्विस करायला गेले तर किती पगार मिळेल? फार तर सहाशेसातशे रुपये मिळतील. धंदा तो तर पुण्याचा खेळ आहे. मला नोकरीत मिळाले असते तेवढेच पैसे घर-खर्चासाठी वापरायचे, बाकी पैसे धंद्यातच वापरायचे. इन्कमटॅक्सवाल्याचे पत्र आले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे की 'बँकेत पैसे आहेत ते भरून टाका. कधी कोणता अँटेक येईल ते सांगता येत नाही. सगळे पैसे खर्च करून टाकले असतील आणि इन्कमटॅक्सचा अँटेक आला तर आपल्याला हार्ट अटेक येईल! सगळीकडे अँटेक घुसले आहेत ना? याला जीवन कसे म्हणायचे? तुम्हाला काय वाटते? चूक आहे असे वाटते की नाही? तर ती चूकच आपल्याला दुरुस्त करायची आहे.
प्रयोग तर करून पाहा भांडण करायचे नाही असे ठरवा ना! तीन दिवसांसाठी तरी ठरवून पाहा! प्रयोग करण्यास काय हरकत आहे. तीन दिवसांचा उपास करतात ना तब्येत्तीसाठी? तसेच हे पण ठरवून तर पाहा. आपण घरात सगळ्यांनी मिळून निश्चित करा की, 'दादाश्री जी गोष्ट करीत होते, ती गोष्ट मला आवडली आहे. म्हणून आजपासून आपले भांडण-तंटे बंद.' मग बघा.
धर्म केला (!) तरी पण क्लेश? जिथे क्लेश नाही तिथे यथार्थ जैन, यथार्थ वैष्णव, यथार्थ शिव धर्म आहे. जिथे धर्माची यथार्थता आहे तिथे क्लेश होत नाही. पण घरोघरी क्लेश आहेत, मग धर्म कुठे गेलेत?
संसार चालवण्यासाठी ज्या धर्माची आवश्यकता आहे, की काय केल्याने क्लेश होणार नाही, एवढेच जरी जमले तरीदेखील धर्म प्राप्त केला असे म्हटले जाईल.