________________
८४
क्लेश रहित जीवन
(देवी-देवता गेले डोंगरावर आणि पीर गेलेत मक्का.)
घरात आपण क्लेशरहित जीवन जगले पाहिजे. एवढे कौशल्य तरी आपल्याला जमले पाहिजे. दुसरे काही जमले नाही तर त्याला समजावले पाहिजे की, 'आपण भांडलो तर देव आपल्या घरातून निघून जातील. म्हणून तू ठरव की आपल्याला भांडण करायचे नाही.' आणि आपणही ठाम ठरवायचे की यापुढे भांडायचे नाही. ठरवल्यानंतर भांडण झाले तर समजायचे की हे आपल्या हातात नव्हते. म्हणून तो आपल्याशी भांडण करत असेल तरी आपण चादर पांघरून झोपून जावे, मग तोही थोड्या वेळाने झोपून जाईल. आणि आपण जर प्रत्युत्तर देत राहिलो तर काय होईल?
पापाचा पैसा, क्लेश करवितो मुंबईत एका उच्च संस्कारी कुटुंबातील बाईंना मी विचारले की, तुमच्या घरी क्लेश-भांडण वगैरे काही होत नाहीत ना? तेव्हा त्या बाई म्हणाल्या, दररोज सकाळी क्लेशाचाच नाश्ता असतो!' मी म्हणालो 'मग तुमच्या नाश्त्याचे पैसे वाचले, नाही का?' त्या म्हणाल्या नाही, 'तरी सुद्धा ब्रेड घ्यायचा, ब्रेडवर लोणी लावत जायचे,' म्हणजे भांडण पण चालू आणि नाश्ता पण चालूच! अरे, असली कसली रे माणसं तुम्ही?
प्रश्नकर्ता : कित्येक लोकांच्या घरी लक्ष्मीच तशा प्रकारची असेल म्हणून भांडणं होत असतील?
दादाश्री : हो या लक्ष्मीमुळेच असे होते. लक्ष्मी जर निर्मळ असेल तर नेहमी सगळे चांगले राहते, मन चांगले राहते. ही अनिष्ट लक्ष्मी घरात घुसली आहे, त्यामुळे घरात भांडणे होतात. आम्ही लहानपणीच निश्चित केले होते की, शक्य तोपर्यंत खोटी लक्ष्मी घरात घुसुच द्यायची नाही, आणि जरी संयोगानुसार खोटी लक्ष्मी घरात घुसलीच तर तिला धंद्यात राहू द्यावी, घरात प्रवेश करू द्यायचे नाही. ते आज सहासष्ठ वर्षे झाली पण खोट्या लक्ष्मीला घरात शिरु दिलेले नाही आणि त्यामुळे घरात कधी