________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
हा विनाकारण ढवळाढवळ करतो! मग बायकोही समजून जाते की याचे डोके खिकसले आहे. नवरा कसा आहे हे ती लगेच जोखते. घोडीला जसे समजते की घोडेस्वार कसा आहे, तसेच बायकोही नवऱ्याचा स्वभाव ओळखते. त्यापेक्षा 'भाभो भारमा तो बहु लाजमा' (नवरा मान मर्यादेत राहिला तर बायकोही मर्यादेत राहील) नियम आणि मार्यादेनेच व्यवहार शोभेल. मर्यादा ओलांडू नका आणि निर्मळ राहा.
प्रश्नकर्ता : स्त्रियांशी पुरुषांच्या कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करु नये?
दादाश्री : पुरुषांच्या कोणत्याच गोष्टीत हस्तक्षेप करू नये. दुकानात किती माल आणला? किती विकला गेला? आज यायला उशीरा का झाले? मग नवऱ्याला सांगावे लागते की, 'आज नऊची गाडी चुकलो.' तेव्हा बायको म्हणेल, 'अशी कशी चुकली? कुठे फिरत होतात?' मग नवरा चिडतो. त्याच्या मनात येते की देवाने जरी असे विचारले असते तरी मी दोन दिल्या असता. पण आत्ता इथे तो काय करेल? नवराबायको असेच कारण नसताना एक-दुसऱ्याच्या कामात दखल देतात. म्हणजे उत्तम बासमती तांदुळाचा भात बनवायचा आणि त्यात खडे टाकून खायचा! त्यात काय स्वाद येईल? नवरा-बायकोने एकमेकांना मदत केली पाहिजे. नवरा जर काळजीत असेल तर ती काळजी कशी दूर होईल अशा तहेने बायकोने बोलायला हवे. तसेच नवऱ्याने पण बायकोची अडचण होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. नवऱ्याने बायकोला समजून घ्यायला हवे की घरात तिला मुले किती हैराण करत असतील! घरात काही तुटले-फुटले तर नवऱ्याने घरात आरडाओरडा करता कामा नये. तरीही कित्येक नवऱ्यांची ओरड असते की गेल्या वर्षी मी इतक्या छान डझनभर कप-बशा आणल्या होत्या त्या सगळ्या त कसे का फोडून टाकल्यास? सगळी नासाडी केली. मग त्या बायकोला वाटते की, मी काय मुद्दाम फोडल्या? मला काय त्या खायच्या होत्या? फुटल्या तर फुटल्या, त्यात मी काय करू? असे म्हणेल. आता तिथेही भांडण. जिथे