________________
क्लेश रहित जीवन
अनावश्यक वस्तूंसाठी विनाकारण पळत राहतो, यालाच 'फेल' म्हटले जाते. तू हिंदुस्तानात राहतो आणि अंघोळीला पाणी मागितले तर आम्ही त्याला 'फेल' म्हणणार नाही.
"
'अपने फेल मिटा दे, फिर गली-गली में फिर. '
(अनावश्यक वस्तूंचा संग्रह सोडून दे, मग खुशाल इकडे-तिकडे फिर)
या देहासाठी काय आवश्यक आहे ? शुद्ध दूध, शुद्ध तूप. पण ह्या शुद्ध वस्तू वापरणार नाहीत आणि पोटात कचरा भरत राहतील. या फेलची काय गरज? हे लोक डोक्याला काय लावतात बरे ? शाम्पू. पाण्यासारखा दिसतो पण धड साबणही नाही असे काहीतरी डोक्याला लावणार. या अतिशहाण्यांनी असे शोध लावले की जे फेल नव्हते तेही फेल झाले ! त्यामुळे अंतरिक सुख कमी झाले ! भगवंताने काय सांगितले होते की, बाह्यसुख आणि अंतरसुख यांच्यात पाच-दहा टक्क्यांचा फरक असेल तर चालेल, पण इतका नव्वद टक्क्यांचा फरक असेल तर ते चालणार नाही. एवढा मोठा फरक असेल तर ते फेलच होणार ! मरावेच लागेल. तसे याच्याने काही मरत नाही पण सहन करावे लागते. अनावश्यक गोष्टींच्या ज्या गरजा वाढवल्या आहेत त्या तर फक्त फेलच आहेत.
एक तास बाजार बंद झाला तरी लोक अस्वस्थ होतात ! अरे, तुला असे काय हवे आहे की ज्यामुळे तुला एवढी बैचेनी होत आहे ? तर म्हणे, मला आईस्क्रीम हवे आहे, सिगारेट हवी आहे! म्हणजे हे तर फेलच (अनावश्यक गोष्टीच ) वाढविल्या ना? आत सुख नाही म्हणून लोक बाहेर शोधत राहतात. लोकांच्या आत जे अंतरिक सुख शिल्लक होते तेही आज संपून गेले आहे. अंतरसुखाचा बॅलेन्स संपवू नका. वाटेल तशी उधळपट्टी करून जवळ शिल्लक असलेले वापरून टाकले. तेव्हा मग अंतरिक सुखाचे संतुलन कसे राहील? अस्सल जगणे चांगले की नक्कल करणे चांगले ? आजकालची मुले एकमेकांची नक्कल करतात पण आपल्याला याची काय गरज? हे फॉरेनचे लोक आपली नक्कल