________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
,,
घ्या. मग घरातल्या सगळ्यांनी निश्चय केला की एक तर याला घरातच घेऊ नये किंवा चांगली खरडपट्टी काढावी. काय करावे यातले ? सगळ्यांनी त्याला आजमावले. मोठा भाऊ सांगायला गेला तेव्हा तो मोठ्या भावाला म्हणाला की, 'तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही. नंतर घरातील सगळेजण मला विचारायला आले की, 'आम्ही काय करावे ? हा तर असे बोलतो. ' तेव्हा मी त्यांना सांगितले की, कुणी त्याला एक अक्षरही बोलू नका. तुम्ही बोलाल तर तो जास्त उर्मट होईल, आणि घरात घेतले नाही तर तो बंडखोर होईल, बाहेर तमाशा करेल. त्याला वाटेल तेव्हा येऊ दे आणि जायचे तेव्हा जाऊ दे. तुम्ही त्याला बरोबर पण म्हणायचे नाही आणि चुकीचे पण म्हणायचे नाही. त्याच्यावर राग पण ठेवायचा नाही आणि द्वेषपण करायचा नाही. समता ठेवायची, करुणा ठेवायची. असे केल्यावर तीन - चार वर्षांनी तो भाऊ सुधारला ! आज तर तो धंद्यात खूप मदत करतो. जगात कोणी निरुपयोगी नाही, पण काम करवून घेता आले पाहिजे. सगळेच परमात्मा आहेत. आणि प्रत्येकजण वेगवेगळे काम सांभाळत आहे, म्हणून कुणाबद्दल नापसंत भाव ठेऊ
नका.
७३
आश्रित असलेल्याला छळणे, घोर अन्याय
प्रश्नकर्ता : माझ्या बायकोशी माझे अजिबात जमत नाही. कितीही निर्दोष गोष्ट केली, माझे खरे असले तरीही ती उलटच अर्थ काढते. बाहेरचा जीवनसंघर्ष तर चालू आहे, पण या व्यक्तीसंघर्षांचे काय करणार ?
दादाश्री : असे आहे, की मनुष्य आपल्या हाताखालील माणसांना इतका छळतो, की काही बाकीच ठेवत नाही. एकदा का स्वतःच्या हाताखाली कोणी माणूस सापडला, मग ती स्त्री असो की पुरुष असो, स्वतःच्या सत्तेत आलेल्या माणसावर अधिकार गाजवून त्याला छळण्यात काहीच बाकी ठेवत नाही.