________________
क्लेश रहित जीवन
'मेरी हालत मै ही जानता हूँ' बोलले की मग बायको खुश होऊन जाते. आणि आपले लोक तर हालत वगैरे काही सांगतच नाहीत. ' अरे, पण तू सांग ना, की तुझी हालत चांगली नाही म्हणून. म्हणजे खुश राहायचे.'
८२
सगळ्यांच्या उपस्थितीत, सूर्यनारायणाच्या साक्षीने, भटजीच्या साक्षीने लग्न केले तेव्हा भटजी म्हणाले होते की, 'शुभ मंगल सावधान' मग तुला सावधान सुद्धा होता आले नाही ? वेळेनुसार सावध झाले पाहिजे. ब्राम्हण म्हणतो, 'शुभ मंगल सावधान' याचा अर्थ ब्राम्हणच समजतो, लग्न करणारा कुठे समजतो ? ! सावधानचा अर्थ काय ? की 'बायको संतापली तेव्हा तू शांत राहायचे, सावध व्हायचे. आता दोघांत भांडण झाले तर तेव्हा शेजारचे भांडण बघायला येतील की नाही ? मग तमाशा होणार की नाही होणार ? भांडल्यानंतर पुन्हा कधीच सोबत राहायचे नसेल तर भांडा. अरे, वाटणीच करून टाका! तेव्हा म्हणे, 'नाही, दुसरीकडे कुठे जाणार ! ' जर पुन्हा एकत्रच राहायचे आहे मग कशाकरिता भांडतात?! आपण सावध व्हायला नको का ? स्त्री जात अशी आहे की, ती बदलणार नाही, म्हणून आपल्यालाच बदलावे लागेल. ती सहज प्रकृती आहे, ती ऐकून घेईल अशी नाही.
बायको चिडली आणि म्हणाली, 'की मी तुमचे जेवणाचे ताट आणणार नाही, तुम्हीच इकडे जेवायला या. आता तुमची तब्येत चांगली झाली आहे तुम्ही चालते-फिरते झाला आहात. असे तर तुम्ही हिंडताफिरता, लोकांशी गप्पा मारता, बिड्या पिता आणि टाईम झाला की वरून आयते हातात ताट मागता. मी नाही येणार!' तेव्हा आपण हळूवार म्हणावे, 'तुम्ही ताट वाढा, मी तिकडे येतो, ' 'मी येणार नाही' असे म्हण्यायच्या अगोदरच तुम्ही सांगा, ताट वाढा मी तिकडे येतोय. माझीच चूक झाली. असे वागाल तर रात्र शांततेत जाईल, नाहीतर रात्र बिघडेल. नवरा तणतणत तिकडे झोपेल आणि बायको इकडे चरफडत राहील. दोघांनाही झोप लागणार नाही. सकाळी पुन्हा चहा-नाश्ता होईल तेव्हा चहाचा कप जोरात