________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
निर्बळ लोक खूप चिडखोर असतात. म्हणून तो चिडेल तेव्हा तू शांत राहून त्याची 'रेकॉर्ड' (बोलणे) ऐक.
___ ज्या घरात भांडणे होत नाहीत ते घर उत्तम. अरे! जरी भांडण झाले पण ते मिटवता आले तरीही उत्तम म्हटले जाईल! एखाद्या दिवशी जेवणाची चव बिघडली तर मियाँभाई चिडतील आणि बायकोला बोलतील की, 'तू अशी आहेस, तू तशीच आहेस;' पण हे ऐकून बायको जर चिडली तर स्वतः मात्र चूप बसेल, तो समजतो की आपण आणखी काही बोललो तर विस्फोट होईल. म्हणून तोही गप्प आणि तीही गप्प! आणि हिंदू लोक तर अशा परिस्थितीत विस्फोट करूनच राहतील!
आमच्याकडे प्रत्येकाची टोपी वेगळी, वाण्याची वेगळी, दक्षिणात्यांची वेगळी, गुजरातींची वेगळी, सोनारांची वेगळी, ब्राम्हणांची वेगळी, प्रत्येकाचीच टोपी वेगळी. प्रत्येकाचा आपापला धर्म. प्रत्येकाचाच 'व्हयू पॉइंट' वेगळा, म्हणून आपापसात जमतच नाही. पण भांडण न केलेलेच बरे.
मतभेद होण्यापूर्वीच,सावधानी आपल्या मनात कलुषित भाव राहिलेलेच नसतील मग त्यामुळे सामोराच्याच्याही मनात कलुषित भाव राहत नाही. आपण चिडलो नाही म्हणजे तेही शांत बसतात, भिंतीसारखे होऊन जावे, म्हणजे ऐकू येणार नाही, आज पन्नास वर्षे झाले पण आमचे कधीही मतभेद झाले नाहीत. हीराबां (दादाश्रींच्या पत्नी) च्या हातून तूप सांडत असेल तरीही मी फक्त पाहातच राहायचो. आम्हाला त्यावेळी ज्ञान हजर राहते की त्या तूप सांडणारच नाहीत.
___मी जरी म्हटले की सांडा तरीदेखील सांडणार नाहीत. मुद्दामहून कोणी तूप सांडेल का बरे ? नाही. तरी पण तूप सांडते, ते पहाण्यासारखे आहे म्हणून आपण पाहावे! आम्हाला तर मतभेद होण्यापूर्वीच ज्ञान ऑन द-मोमेंट (त्या क्षणी) हजर राहते.