________________
क्लेश रहित जीवन
भाजी आपल्याकडून खाल्ली जाईल आणि आवडत नाही म्हटल्यावर भाजीला आणि भाजी बनवणारीला राग येईल. त्याचबरोबर घरातील मुलांना काय वाटेल की यांची नेहमीचीच कटकट, कायम असेच करत असतात. म्हणजे घरातली मुलेही आपली अब्रू (!)पाहतात.
___ आमच्या घरी दादांना काय आवडते आणि काय आवडत नाही हे कुणालाच माहित नाही. स्वयंपाक बनवणे हे काय बनवणाऱ्याच्या हाताचा खेळ आहे ? ते तर खाणाऱ्याच्या 'व्यवस्थित' च्या हिशोबानुसार ताटात येते. त्यात उगीच लुडबुड कशाला करायची?
इतकी चैन, तरी उपभोगत नाही जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो तेव्हा पोट बिघडते, पोटात मुरड पडते. वारंवार हॉटेलमध्ये खाल्यावर हळूहळू आम एकत्र होतो आणि एकीकडे जमा होतो. नंतर जेव्हा त्याचा परिपाक होतो तेव्हा पोटात मुरड पडते आणि पोट पिळून निघते. मुरड पडते ना, तो तर कित्येक वर्षानंतर परिपाक होत असतो. जेव्हा मला असा अनुभव आला तेव्हापासून मी सगळ्यांना हेच सांगतो की, हॉटेलचे खाणे टाळा. एकदा आम्ही मिठाईच्या दुकानात गेलो होतो. त्या मिठाई बनवणाऱ्याच्या अंगातून घाम गळत होता, कचरा पडत होता! आजकाल तर घरात जेवण बनवतात तेही शुद्ध-स्वच्छ नसते. कणिक मळतात तेव्हा हात नीट धुतलेले नसतात. नखात मळ भरलेला असतो. आजकाल नखे कापत नाहीत ना? इथे कित्येक असे येतात ज्यांची लांब नखे असतात त्यांना मला सांगावे लागते की, ताई यात तुमचा काही फायदा आहे का? फायदा असेल तर मग असू द्या. तुम्हाला ड्रॉइंगचे काम करायचे असेल तर मग लांब नखे राहू द्या. तेव्हा त्या म्हणतात की असे काही नाही. उद्या नखे कापून येते. या लोकांना काही सेन्सच (समजच) नाही. नखे वाढवतात, आणि कानाला रेडीयो लावून फिरतात! स्वत:चे सुख कशात आहे याचे भान नाही, आणि स्वत:चे भान तरी कुठे आहे? लोकांकडून जितके मिळाले तितकेच भान त्यांना असते.