________________
जीवन जगण्याची कला
'करेक्टनेस' तर केव्हा म्हटली जाते की जेव्हा जीवन जगण्याची कला शिकला असेल. कोणी वकील झाला तरी देखील त्याला जीवन जगण्याची कला आली नाही. मग कोणी डॉक्टर झाला पण तरीही जीवन जगण्याची कला जमली नाही. तुम्ही 'आर्टिस्ट' ची कला शिकली किंवा अशीच एखादी दुसरी कुठली कला शिकली पण एवढ्याने तुम्हाला जीवन जगण्याची कला आली असे म्हणता येणार नाही. जीवन जगण्याची कला तर, एखादा मनुष्य अगदी आनंदाने चांगल्या प्रकारे जीवन जगत असेल अशा मनुष्याला आपण विचारले की तुम्ही इतक्या आनंदाने कसे काय जीवन जगता, मलाही असे काही शिकवा. मी कसे वागू की ही कला मला अवगत होईल ? यासाठी कलावंत हवा, याचा गुरु असायला हवा, पण याची तर कोणाला पर्वाच नाही. जीवन जगण्याच्या कलेची गोष्टच उडवून दिली आहे ना! आमच्याजवळ जो कोणी राहील त्याला ही कला अवगत होईल. पण तरी जगात कुणाजवळच ही कला नाही असे आपण म्हणू शकत नाही. पण जर जीवन जगण्याची कला 'कम्प्लीट' शिकलेली असेल तर लाईफ इजी ( जीवन सोपे) बनते पण तरी धर्म सुद्धा सोबत पाहिजेच. जीवन जगण्याच्या कलेत धर्म ही मुख्य वस्तू आहे. आणि धर्मात सुद्धा इतर काही नाही, मोक्षधर्माचीही गोष्ट नाही, फक्त भगवंताच्या आज्ञारुपी धर्माचे पालन करायचे. महावीर भगवंत किंवा कृष्ण भगवंत किंवा तुम्ही ज्या भगवंताला मानत असाल त्यांची आज्ञा काय सांगू इच्छिते ते समजून त्याचे पालन करा. आता सगळ्या आज्ञा पालन करू शकत नसाल तर जितक्या पाळता येईल तितक्या पाळा. आता आज्ञेत असेल की, 'ब्रम्हचर्य पाळा' आणि तुम्ही लग्न केलेत तर ते विरोधाभास म्हटले जाईल. खऱ्या अर्थाने ते तुम्हाला असे सांगत नाहीत की, तुम्ही असे विरोधाभासाने वागा. ते तर असे सांगू इच्छितात की तुला आमच्या जितक्या आज्ञा पाळता येईल तितक्या पाळ. आपणास दोन आज्ञा पाळण्याचे जमले नाही म्हणून काय बाकीच्या सर्व आज्ञा पाळणे सोडून द्यायचे ? तुम्हाला काय वाटते? समजा, दोन आज्ञा पाळता येत नाहीत पण दुसऱ्या दोन आज्ञा पाळल्या तरी खूप झाले.
३