________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
तुमच्याकडे येतात. तुम्ही मुलांना खायचे, प्यायचे बनवून द्या आणि तुमचे कर्तव्य पार पाडा. दुसरे काही सांगण्यासारखे नाही. सांगून फायदा नाही असा निष्कर्ष काढला आहे का तुम्ही? मुलं मोठी झाली आहेत, ती काय आता शिडी वरुन खाली पडतात? तुम्ही तुमचा 'आत्मधर्म' का म्हणून विसरता? या मुलांशी तर रिलेटिव्ह धर्म आहे. तिथे डोकेफोड करण्यात काही अर्थ नाही. भांडण करण्याऐवजी मौन बाळगलेले जास्त चांगले. भांडण केल्याने तर स्वतःचेही बिघडते आणि दुसऱ्यांचेही बिघडते.
प्रश्नकर्ता : मुलांना आपली जबाबदारी समजत नाही.
दादाश्री : जबाबदारी 'व्यवस्थित शक्तीची' आहे. तो तर त्याची जबाबदारी समजलेलाच आहे. त्याला समजावून सांगणे तुम्हाला जमत नाही म्हणून गडबड होते. समोरच्याला आपले म्हणणे पटले तर आपले सांगितलेले कामाचे. इथे तर आई-वडीलच वेड्यासारखे वागतात मग मुले पण वेडेपणा करणारच ना?
प्रश्नकर्ता : मुले उद्धट बोलतात.
दादाश्री : हो, पण तुम्ही ते कसे बंद कराल? तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूने तसे बोलणे बंद केले तर सगळ्यांचे चांगले होईल.
एकदा जर मनात फुट पडली, मन कलुषीत झाले की मग त्याची लिंक चालू होते. नंतर मनात त्यांच्याविषयी अभिप्राय बनून जातो की ही व्यक्ती अशीच आहे. अशा वेळी आपण मौन (गप्प) राहून समोरच्याचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. फक्त बडबड केल्याने कुणाचे काही सुधरत नाही. सुधारण्याचे सामर्थ्य तर केवळ ज्ञानी पुरुषांच्या वाणीतच आहे. मुलांसाठी तर आई-वडिलांची जोखीमदारी आहे. तुम्ही बोलले नाही तर नाही का चालणार? चालणार. म्हणूनच भगवंतानी म्हटले आहे की जिवंत असून सुद्धा मेलेल्याप्रमाणे वागा. बिघडलेल्याचे मन तोडू नये. बिघडलेल्याला सुधारु शकतो. बिघडलेल्याला सुधारणे हे
तर आई-वडिलांची जोली ज्ञानी पुरुष
बोलले नाही तर ना