________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
७१
नुकसान करता आणि समोरच्याचेही नुकसान होते! त्याला कोण सुधारू शकेल? जो स्वतः सुधरलेला असतो तोच सुधारू शकेल? स्वत:च धड नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार?
प्रश्नकर्ता : आपण सुधरलो असू तर दुसऱ्याला सुधारू शकतो ना?
दादाश्री : हो सुधारू शकतो. प्रश्नकर्ता : सुधारलेल्याची व्याख्या काय?
दादाश्री : तुम्ही समोरच्या व्यक्तीला रागावले तरीही तुमच्या रागावण्यात समोरच्याला प्रेम वाटेल. तुम्ही त्याला खडसावले तरीही तुमच्याविषयी त्याला प्रेमच वाटेल की, ओहोहो! माझ्या वडिलांचे माझ्यावर किती प्रेम आहे ! रागवा, पण प्रेमाने रागावले तर तो सुधरेल. या कॉलेजमध्ये प्रोफेसर विद्यार्थ्यांना रागवू लागले तर विद्यार्थी प्रोफेसरांना देखील मारतील!
समोरचा सुधारावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, पण जे प्रयत्न 'रिअॅक्शनरी' असतील असे प्रयत्न करु नये. आपल्या रागावल्यामुळे त्याला दुःख होत असेल तर त्यास प्रयत्न म्हणत नाही. प्रयत्न आत केले पाहिजे, सूक्ष्म रितीने! स्थूल रितीने प्रयत्न करणे आपल्याला जमत नसेल तर सूक्ष्म रितीने प्रयत्न करावा. जास्त रागावल्याने बिघडत असेल तर थोडक्यात सांगावे की, 'आपल्याला हे शोभत नाही.' बस, एवढेच सांगून गप्प बसावे. सांगावे तर लागते पण सांगण्याचीही एक पद्धत असते.
नाही तर प्रार्थनेचे 'एडजस्टमेन्ट' प्रश्नकर्ता : समोरच्याला समजावण्यासाठी मी पुरुषार्थ केला मग त्याला समजेल किंवा नाही समजेल तो त्याचा पुरुषार्थ म्हणायचा का?
दादाश्री : त्याला समजावण्याचा प्रयत्न करणे एवढीच तुमची