________________
आदर्श व्यवहार
जगात एक माणूस जरी आदर्श व्यवहार करणारा असेल तर त्यामुळे संपूर्ण जग बदलू शकते.
प्रश्नकर्ता : आदर्श व्यवहार कशाप्रकारे होऊ शकतो ?
१७५
दादाश्री : तुम्हाला ( महात्म्यांना) जे निर्विकल्प पद प्राप्त झाले आहे, तर त्यात राहिल्याने आदर्श व्यवहार आपोआप येईल. निर्विकल्प पद प्राप्त झाल्यानंतर काही हस्तक्षेप होत नाही, तरी सुद्धा तुमच्याकडून हस्तक्षेप झाला तर तुम्ही माझ्या आज्ञेत नाही. आमच्या पाच आज्ञा तुम्हाला महावीर भगवंताच्या स्थितीत ठेवतील अशा आहेत. (दैनंदिन) व्यवहारात आमच्या आज्ञा तुम्हाला बाधक नाहीत, त्या तुम्हाला आदर्श व्यवहारात ठेवतील अशा आहेत. हे 'ज्ञान' तर व्यवहाराला संपूर्ण आदर्श करू शकेल असे आहे. मोक्ष कोणाला मिळेल ? ज्याचा व्यवहार आदर्श आहे त्याला. आणि 'दादां' ची आज्ञा व्यवहाराला आदर्श बनवते. थोडी जरी चूक झाली तरी तो व्यवहार आदर्श नाही. मोक्ष म्हणजे काय नुसत्या थापा मारणे नाही, ते वास्तविक स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे वकिलांनी लावलेला शोध नाही! वकील तर गप्पांमधूनही ( पुरावे) शोधून काढतील, तसे हे कर. एकच जन्म क्लेशरहित जीवन जगलात तरी तुम्ही मोक्षाला जाण्याचा हद्दीत आलात नाही. हे तर वास्तविक स्वरूप आहे.
एक भाऊ मला एका मोठ्या आश्रमात भेटले. मी त्यांना विचारले की, 'तुम्ही इथे कसे ?' तेव्हा ते म्हणाले, 'मी या आश्रमात गेल्या दहा वर्षांपासून राहत आहे.' तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'तुमचे आई-वडील तर अत्यंत हलाखीच्या अवस्थेत गावात म्हातारपण घालवत आहेत, खूप दु:खी आहेत.' तेव्हा त्यांनी सांगितले की, 'त्यात मी काय करू ? मी त्यांचे करीत बसलो तर माझे धर्मकार्य करण्याचे राहून जाईल.' याला धर्म कसे म्हणू शकतो ? धर्म तर त्यास म्हणतात की, ज्यात आई - वडिलांना विचारतात, भावाला विचारतात. सगळ्यांनाच धरून चालतात. व्यवहार आदर्श असायला हवा. जो व्यवहार स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करतो,