________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
असे काही तरी करा.' मी तुम्हाला तीनशे रुपये जास्त देईन.' वडील मुलाला म्हणाला, 'तू असा निघशील असे मला माहित असते तर तुला जन्मतःच मारून टाकले असते! तेव्हा मुलगा म्हणाला की, 'तुम्ही मला मारले नाही हेही आश्चर्यच आहे ना!!' असेच नाटक घडायचे होते मग कसे मारील?! अशी नाटके तर अनंत प्रकारची घडलेली आहेत. अरे! ऐकताच कानाचे पडदे फाटतील!! अरे, याहीपेक्षा त-हेत-हेचे असंख्य किस्से या जगात घडलेले आहेत, म्हणून जगापासून सावध राहा. आता 'स्वत:च्या' देशाकडे वळा. स्वदेशात परता. परदेशात तर भूतेच भुते आहेत. जाल तिथे भुते!
_कुत्री पिल्लांना दूध पाजते ते तिचे कर्तव्य आहे, ती काय काय उपकार करत नाही, म्हशीच्या रेडकूने दोन दिवस दूध प्यायले नाही तर म्हशीला खूप वेदना होते. हे तर स्वत:च्या गरजेने दूध पाजतात. बाप मुलांना मोठे करतो तेही स्वत:च्या गरजेनेच. त्यात नवीन काय केले? ते तर कर्तव्य आहे.
मुलांबरोबर 'ग्लास विथ केअर' प्रश्नकर्ता : दादा घरात मुले-मुली ऐकत नाहीत. मी खूप रागावतो तरी पण काहीच परिणाम होत नाही.
दादाश्री : या रेल्वेच्या पार्सल्सवर लेबल लावलेले तुम्ही पाहिले आहेत का? 'ग्लास हॅन्डल विथ केअर' (काच आहे, सांभाळा) असे लिहिलेले असते ना? तसेच घरात पण 'ग्लास हॅन्डल विथ केअर' वागावे. आता काच असेल आणि त्याला तुम्ही हातोड्याने मारत राहिले तर काय होईल? त्याच प्रमाणे घरातील माणसांना काचेप्रमाणे सांभाळले पाहिजे. तुम्हाला त्या बंडलवर (काचेच्या वस्तूंवर) कितीही चीड आली तरी तुम्ही त्यास खाली फेकाल का? लगेच वाचाल की, 'ग्लास हॅन्डल विथ केअर'! घरी काय होत असते की, काही झाले तर लगेच तुम्ही मुलींवर ओरडता की, 'अशी कशी पर्स हरवली, कुठे गेली होतीस? लक्ष