________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
११९
दादाश्री : व्यवहार तर लोकांना मुळी येतच नाही. व्यवहार जर लोकांना आला असता, अगदी अर्धा तासभर जरी आला असता तरी पुष्कळ झाले असते ! व्यवहाराला तर समजलेलेच नाही. व्यवहार म्हणजे काय? तर उपलक (वरवरचा)! व्यवहार म्हणजे सत्य नाही. लोकांनी तर व्यवहारालाच सत्य मानून घेतलेले आहे. व्यवहारात सत्य म्हणजे जे रिलेटिव्ह मध्ये सत्य आहे ते. इथल्या नोटा खऱ्या असोत की खोट्या त्या 'तिथल्या' स्टेशनवर चालत नाहीत. म्हणून सोडा ना ही झंझट. आपण
आपले (मोक्षाचे) काम काढून घ्या. व्यवहार म्हणजे (मागील जन्मी) दिलेले परत घेणे. आता जर कुणी म्हटले की, 'चंदुलालला अक्कल नाही.' तर आपण समजावे की, आपण जे दिले होते तेच परत मिळाले! हे जर लक्षात आले तर त्यालाच व्यवहार म्हटले जाते. आजकाल कुणाला व्यवहार कळतच नाही. ज्याच्यासाठी व्यवहार, व्यवहारच आहे; त्याचा निश्चय, निश्चय आहे.
...आणि सम्यक् म्हटल्याने भांडण मिटते
प्रश्नकर्ता : जर कोणी जाणूनबुजून वस्तू फेकून दिली, तर अशा प्रसंगी एडजस्टमेन्ट कशी करावी?
दादाश्री : ही तर फक्त वस्तूच फेकली पण मुलाला जरी फेकले ना, तरी देखील आपण पाहत राहावे. बाप मुलाला फेकत असेल तरीही पाहत राहावे. नाही तर काय आपण नवऱ्याला फेकून द्यायचे? एकाला तर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल मग दुसऱ्यालाही पाठवायचे का? आणि नंतर जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो मग तुम्हाला बदडणार, मग तीथेही हॉस्पिटलमध्ये!
प्रश्नकर्ता : तर मग काहीच बोलायचे नाही का?
दादाश्री : बोलायचे, पण सम्यक् बोलता येत असेल तर बोला. नाही तर कुत्र्यासारखे भूकंण्यात काय अर्थ ? म्हणून सम्यक् बोलावे.