________________
क्लेश रहित जीवन
चालत असू आणि रस्त्यात खांब आला तर आपण त्या खांबाला वळून चालले पाहिजे की, त्या खांबाला धडक दिली पाहिजे?' तो म्हणाला की 'नाही! धडक दिली तर डोके फुटेल.'
प्रश्नकर्ता : वाटेत जर दगड पडलेला असेल तर आपण काय करायला हवे? तर दगडाला फिरून जायला हवे. रस्त्यात जर म्हशीचा भाऊ (रेडा) आडवा आला तर तुम्ही काय कराल? म्हशीच्या भावाला ओळखतात ना तुम्ही? तो समोरून येत असेल तर त्याच्यापासून लांब जावे लागेल नाही तर शिंगे मारून आपले डोकं फोडून टाकेल. त्याचप्रमाणे जर अशा प्रकारचा मनुष्य येत असेल तर लांबून जावे लागते. असेच संघार्षाचेही आहे. एखादा मनुष्य आपल्यावर रागावण्यासाठी आला, त्याचे शब्द तोफांच्या गोळ्यासारखे निघत असतील, तेव्हा आपण समजून घ्यायला हवे की, आपल्याला संघर्ष टाळायचा आहे. ध्यानी मनी नसताना जर अचानकच आपल्या मनावर काही परिणाम होऊ लागला तर अशा वेळेस आपण हे समजावे की, समोरच्याच्या मनाचा परिणाम आपल्यावर झाला आहे. म्हणून आपण तिथून निघून जावे. हे सगळे संघर्ष आहेत. हे जसजसे तुम्ही समजू लागाल तसतसे तुम्ही संघर्ष टाळू शकाल, संघर्ष टाळल्याने मोक्ष प्राप्त होतो! हे जग एक संघर्षच आहे. स्पंदन स्वरूप आहे. १९५१ साली मी एका 'व्यक्तीला हे एक सूत्र दिले होते. संघर्ष टाळ' असे त्याला सांगितले होते आणि अशाप्रकारे त्याला समजावले होते. म्हणजे मी शास्त्र वाचत होतो तेव्हा तो येऊन मला म्हणाला की, 'दादा, मला काहीतरी द्या.' तो माझ्या इथे नोकरी करत होता, तेव्हा मी त्याला म्हणालो, 'तुला काय देणार? तू तर आख्या जगाशी, सगळ्यांशीच भांडण करून येतोस, मारामारी करून येतोस. रेल्वेत सुद्धा दोन हात करून येतोस, असे तर पैशाला पाण्यासारखे खर्च करतोस, आणि रेल्वेत जे नियमानुसार पैसे भरायला हवे ते भरत नाहीस आणि वरून त्यांच्याशी भांडण करतोस.' हे सर्व मला माहित होते म्हणून मी त्याला म्हणालो की तू संघर्ष टाळ. तुला इतर काही शिकण्याची गरज नाही. तो आज सुद्धा