________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
आले असेल त्याला तर ओवाळले पाहिजे. नाहीतर सगळे बाप बनतातच ना? ऑफिसमध्ये साहेबाने फटकारले आणि घरी मुलगा पप्पा पप्पा करत आला तर पप्पा सगळे विसरून खुश होतो कारण ही पण एक प्रकारची दारूच आहे, ती सगळे विसरवून टाकते !
५३
एकही मुलबाळ नसेल आणि जर मूल जन्माला आले तर ते खूप हसवते, बापाला खूप आनंद देते. जेव्हा तेच मुल सोडून जाते तेव्हा तितकेच दु:खही देते. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जे आले आहेत ते जाणारही, मग तेव्हा काय - काय होईल ? म्हणून आजपासूनच हसायचे नाही, म्हणजे नंतर कसली भानगडच नाही ना ! नाही तर कोणत्या जन्मात मुले नव्हती ? कुत्रे, मांजरे सगळ्याच ठिकाणी पिल्ले, पिल्ले आणि पिल्लांनाच कवटाळून धरले ना ! या मांजरीच्याही मुली असतातच ना !
व्यवहार नॉर्मोलीटीपूर्वक असावा
म्हणून प्रत्येकात नॉर्मालीटी आणा. एका डोळ्यात प्रेम आणि एका डोळ्यात सक्ती ठेवा. सक्तीने समोरच्याला जास्त दुःख होत नाही. क्रोध केल्याने फार नुकसान होते. सक्ती म्हणजे क्रोध नाही पण फुत्कार. आम्ही पण धंद्यावर जातो तेव्हा फुत्कार मारतो, 'तुम्ही असे का करता? काम का करत नाही ?' व्यवहारात ज्या ठिकाणी जो भाव असायला हवा तो भाव उत्पन्न होत नसेल तर तो व्यवहार बिघडेल.
एक माणूस माझ्याजवळ आला, तो बँकेचा मॅनेजर होता. तो मला म्हणाला की, 'मी माझ्या घरी बायकोला आणि मुलाला एक अक्षर देखील बोलत नाही. मी एकदम शांत राहतो.' त्यावर मी त्यांना म्हणालो, 'तुम्ही अगदी शेवटच्या प्रकारचे बेकार मनुष्य आहात. या जगात तुम्ही काहीच कामाचे नाहीत.' त्या माणसाला मनात असे वाटत होते की, मी असे सांगेल तर दादा मला खूप मोठे बक्षीस देतील. अरे मूर्खा, याचे काय बक्षीस दिले जाते ? मुलगा काही चुकीचे करीत असेल त्यावेळी त्याला