________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
काय? तेव्हा म्हणे की, 'मी विधवा झाली तरी चालेल, पण तिला विधवा करेल तेव्हाच मी खरी!'
आम्हाला हे सगळे आजही तादृश्य दिसते, या भरत राजाच्या राणीचे आम्हाला तादृश्य दिसते. त्या दिवशी कसे तोंड फुगलेले असेल. आतून राजा किती संकटात अडकलेला असेल, राजाच्या मनात कशी चिंता उद्भवत असेल, ते सगळेकाही तादृश्य दिसते! एका राणीचे लग्न जर तेराशे राजांबरोबर झाले असेल तर त्या राजांची तोंडे कधी फुगणार नाहीत! कारण पुरुषांना तोंड फुगवता येतच नाही ना.
आरोप, किती दुःखदायी सगळे काही तयार आहे, पण उपभोगता येत नाही. उपभोगण्याची रीत माहीत नाही. मुंबईतील शेठ लोक मोठ्या टेबलावर जेवायला बसतात पण जेवण झाल्यावर 'तू असे केलेस, तू तसे केलेस, विनाकारण तू माझा जीव जाळतेस.' विनाकारण कोणी जीव जाळतो का? नियमानुसारच जाळतो, विनाकारण कोणी जाळतच नाही. या लाकडाला लोक जाळतात पण लाकडाच्या कपाटाला कोणी जाळतो का? जे जाळायचे असेल तेच जाळतात. तरी असे आरोप चालू असतात. कोणत्याही गोष्टीचे भानच नाही. मनुष्यपण बेभान झालेले आहे. नाहीतर घरात असे आरोप करायचे असतात का? पूर्वीच्या काळी लोक कधीही एकमेकांवर असे आरोप करत नसत. आरोप करण्यासारखी वेळ आली तरी करत नसत त्यांच्या मनात जाणीव असायची की, आरोप केले तर समोरच्याला किती दुःख होईल आणि कलियुगात तर केव्हा माझ्या कचाट्यात येईल याचीच वाट पाहत असतात. घरात मतभेद का असावेत?
आदळ-आपट याला तुम्हीच जबाबदार प्रश्नकर्ता : मतभेद व्हायचे कारण काय? दादाश्री : भयंकर अज्ञान! त्याला संसारात जीवन जगणे जमत