________________
१७४
क्लेश रहित जीवन
उणीव भासत असेल तर आमच्याजवळ या. आमच्याकडे तर प्रेमाचाच वर्षाव असतो. कोणी द्वेषाने आला असेल तरीही त्याला प्रेमच मिळेल.
क्रमिक मार्ग म्हणजे प्रथम शुद्ध व्यवहार करा, आणि शुद्ध व्यवहारवाले बनून मग शुद्धात्मा बना आणि अक्रम मार्ग म्हणजे प्रथम शुद्धात्मा बना मग शुद्ध व्यवहार करा. शुद्ध व्यवहारात व्यवहार सगळाच असतो पण त्यात वीतरागता असते. एक-दोन जन्मात मोक्षाला जाणार असाल तेव्हापासून शुद्ध व्यवहाराची सुरुवात होते.
शुद्ध व्यवहार स्पर्शत नाही त्याचे नाव निश्चय! व्यवहार अशा पद्धतीने पूर्ण करावा की, निश्चयाला स्पर्श करू शकणार नाही, मग तो कुठल्याही प्रकारचा व्यवहार असो.
चोख व्यवहार आणि शुद्ध व्यवहारात फरक आहे. व्यवहार चोख ठेवणे म्हणजे मानवधर्म आणि शुद्ध व्यवहार तर थेट मोक्षाला घेऊन जातो. घरात किंवा बाहेर भांडण-तंटे न करणे म्हणजे चोख व्यवहार. आणि आदर्श व्यवहार कशास म्हणतात? स्वतःचा सुगंध सर्वत्र पसरवणे म्हणजे आदर्श व्यवहार.
आदर्श व्यवहार आणि निर्विकल्प पद, या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर आणखी काय पाहिजे. यात तर पूर्ण ब्रम्हांडाला बदलण्याची शक्ती आहे.
आदर्श व्यवहाराने मोक्ष प्राप्ती दादाश्री : तुझा व्यवहार कसा करु इच्छितो? प्रश्नकर्ता : संपूर्ण आदर्श.
दादाश्री : म्हातारे झाल्यानंतर आदर्श व्यवहार केला तर त्याचा काय उपयोग? आदर्श व्यवहार तर जीवनाच्या सुरुवातीपासूनच असायला हवा?