________________
आदर्श व्यवहार
१७३
शुद्ध व्यवहार : सद्व्यवहार प्रश्नकर्ता : शुद्ध व्यवहार कशास म्हणावे? सद्व्यवहार कशास म्हणावे?
दादाश्री : स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर शुद्ध व्यवहाराची सुरुवात होते, तोपर्यंत सद्व्यवहार चालू असतो.
प्रश्नकर्ता : शुद्ध व्यवहार आणि सद्व्यवहार यात काय फरक
आहे?
दादाश्री : सद्व्यवहार अहंकार सहित असतो आणि शुद्ध व्यवहारात अहंकार नसतो. निरहंकारी असतो. शुद्ध व्यवहारात संपूर्ण धर्मध्यान असते आणि सद्व्यवहारात अत्यंत अल्प प्रमाणात धर्मध्यान असते.
जितका शुद्ध व्यवहार असेल तितका शुद्ध उपयोग राहतो. शुद्ध उपयोग म्हणजे 'स्वतः' ज्ञाता-द्रष्टा असतो, पण पाहायचे काय? तर म्हणे, शुद्ध व्यवहाराला पाहा. शुद्ध व्यवहारात निश्चय, शुद्ध उपयोग असतो.
कृपाळू देवांनी म्हटले आहे: 'गच्छ्मतनी जे कल्पना ते नही सद्व्यवहार.'
(सगळ्या पंथाची, संप्रदायाची मते किंवा कल्पना म्हणजे सद्व्यवहार नव्हे.)
सगळे संप्रदाय, कल्पित गोष्टी आहेत. तिथे सद्व्यवहार सुद्धा नाही मग तिथे शुद्ध व्यवहाराविषयी काय बोलावे? शुद्ध व्यवहार हे निरहंकारी पद आहे, शुद्ध व्यवहार हे स्पर्धा रहित आहे. आपण जर स्पर्धेत उतरलो तर राग-द्वेष होतीलच. आम्ही तर सगळ्यांना सांगतो की, तुम्ही जिथे आहात तिथेच ठीक आहात. आणि त्यात तुम्हाला जर काही