________________
[१०]
आदर्श व्यवहार अखेर, व्यवहार आदर्श हवाच आदर्श व्यवहाराशिवाय कुणीही मोक्षाला गेलेला नाही. जैन व्यवहार म्हणजे आदर्श व्यवहार नाही. वैष्णव व्यवहार म्हणजे आदर्श व्यवहार नाही. मोक्षाला जाण्यासाठी आदर्श व्यवहार पाहिजे.
आदर्श व्यवहार म्हणजे आपल्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होऊ नये असे वर्तन. घरातील, बाहेरील, शेजारीपाजारी असे कुणालाही दुःख होणार नाही असे वर्तन म्हणजे आदर्श व्यवहार.
जैन व्यवहाराचा अभिनिवेश (आपलेच मत बरोबर आहे असे मानणे) करणे योग्य नाही. तसेच वैष्णव व्यवहाराचाही अभिनिवेश करणे योग्य नाही. हा सगळा अभिनिवेश व्यवहार आहे. महावीर भगवंताचा आदर्श व्यवहार असायचा. आदर्श व्यवहार असला तर शत्रूला सुद्धा दुःख होणार नाही. आदर्श व्यवहार म्हणजे मोक्षाला जाण्याची निशाणी. जैन किंवा वैष्णव संप्रदायातून मोक्ष मिळत नाही. आमच्या आज्ञा तुम्हाला आदर्श व्यवहाराकडे घेऊन जातात. त्या तुम्हाला संपूर्ण समाधी अवस्थेत ठेवू शकतील अशा आहेत. आधी-व्याधी-उपाधी अशा तीनही अवस्थेत समाधीत ठेवू शकतील अशा आहेत. सारा बाह्य व्यवहार हा रिलेटिव्ह आहे, आणि हे तर 'सायन्स' आहे. सायन्स म्हणजे रियल!