________________
मनुष्यपणाची किंमत
१६९
फार मोठा गुण आहे, तो मोक्षाला घेऊन जाईल. कारण भगवंताच्या संपूर्ण विरोधात गेला. भगवंताच्या संपूर्ण विरोधीला मोक्षात घेऊन जाण्याशिवाय सुटकाच नाही! एकतर भगवंताचा भक्त मोक्षाला जातो किंवा भगवंताचा संपूर्ण विरोधी मोक्षाला जातो!! म्हणून जो नादार आहे त्याला मी सांगतो की शंभर टक्के 'इनसिन्सियर' हो, मग मी तुला दुसरा मार्ग दाखविन, जो तुला थेट मोक्षात घेऊन जाईल. केवळ शंभर टक्के 'इनसिन्सियर' राहून भागणार नाही, त्याला दुसरा मार्ग दाखवावाच लागेल, तेव्हाच काम होईल.