________________
आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट'
१६५
... तरीही निसर्ग सदैव तुमच्या मदतीसाठी तयार
प्रश्नकर्ता : शुभ मार्गी जाण्याचे विचार येतात पण ते टिकत नाहीत आणि पुन्हा अशुभ विचार मनात येतात, हे असे का?
दादाश्री : विचार म्हणजे काय? पुढे जायचे असेल तरी विचार काम करतात आणि मागे वळायचे असेल तरीही विचार काम करतात. परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटेने पाऊल उचलतात आणि पुन्हा मागे वळतात, हे अशाप्रकारे होत आहे. एक मैल पुढे जातात आणि एक मैल मागे वळतात, एकाच प्रकारचे विचार करणे उत्तम. मागे यायचे ठरवले म्हणजे मागेच यायचे आणि पुढे जायचे ठरवले मग पुढेच जायचे. ज्याला पुढे यायचे असेल तर त्यालाही निसर्ग मदत करतो आणि ज्याला मागे जायचे असेल त्यालाही निसर्ग मदत करतो. निसर्ग काय म्हणतो? 'आय विल हेल्प यु.' (मी तुम्हाला मदत करेल.) तुला जे काम करायचे असेल, मग चोरी करायची असेल तरीही 'आय विल हेल्प यु.' निसर्गाची तर खूप मोठी मदत आहे, निसर्गाच्या मदतीनेच तर हे सगळे चालत आहे! पण तू ठरवतच नाहीस की मला काय करायचे आहे ? जर तू ठरवलेस तर निसर्ग तुला मदत करण्यासाठी तयारच आहे. प्रथम हे ठरवा की मला असे असे करायचे आहे, मग तो निश्चय रोज सकाळी आठवा. तुमच्या निश्चयाला तुम्ही 'सिन्सियर' राहिले पाहिजे, तर निसर्ग तुम्हाला मदत करेल. तुम्ही निसर्गाचे ‘पाहूणे' आहात.
___म्हणून गोष्ट नीट समजून घ्या. निसर्ग तर नेहमीच म्हणतो 'आय विल हेल्प यु.' देव तुम्हाला मदत करीत नाही. देव तसा रिकामाही नाही. ही सगळी निसर्गाचीच रचना आहे. आणि ती फक्त भगवंताच्या हजेरीमुळेच निर्माण झाली आहे.
प्रश्नकर्ता : आपण निसर्गाचे 'गेस्ट' आहोत की 'पार्ट ऑफ नेचर' (निसर्गाचा भाग) आहोत?