________________
१६६
क्लेश रहित जीवन
दादाश्री : 'पार्ट ऑफ नेचर' पण आहात आणि 'गेस्ट' पण आहात. आम्ही पण 'गेस्ट' बनून राहणे पसंत करतो. तुम्ही कुठेही बसलात तरी तुम्हाला हवा मिळत राहील, पाणी मिळत राहील आणि ते सुद्धा 'फ्री ऑफ कॉस्ट' (फुकट)! जे जास्त मौल्यवान आहे ते फुकट मिळत राहते. निसर्गाला ज्याची किंमत आहे त्याची किंमत मनुष्याला वाटत नाही. आणि निसर्गाला ज्याची किंमत नाही (जसे की हिरे, मोती) त्याची मनुष्याला खूप किंमत आहे.