________________
आपण सर्व निसर्गाचे 'गेस्ट'
मग यात निसर्गाची काही चूक झाली असेल का ? नाही, निसर्गाला माहित आहे की जन्माला आल्यावर लगेच दूध प्यायचे आहे, दुसरा आहार पचणार नाही, आईचे दूध प्यायचे आहे, दात दिले तर तो चावून घेईल ! पाहा किती सुंदर रचना केली आहे ! जसजशी गरज भासेल तसे दात येत जातील. प्रथम चार येतील मग हळूहळू आणखी दुसरे येतील, आणि या म्हाताऱ्यांचे दात पडले तर परत येत नाहीत !
१६३
निसर्ग सगळीकडून पद्धतीने रक्षण करतो. राजासारखे ठेवतो. पण या अभाग्याला हे समजत नाही त्यास काय करणार ?
पण ढवळाढवळ करून दुःख निर्माण केले
रात्री पुरणपोळी खाऊन झोपून जातो ना ? मग घोरत राहतो! अरे बाबा, आत काय चालू आहे त्याचा तपास तरी कर! तेव्हा म्हणेल 'त्यात मी काय करू?' आणि निसर्गाची कार्यपद्धती कशी आहे ? पोटात पाचक रस निर्माण होतात, बाईल (पित्त) वगैरे सर्व निर्माण होतात. सकाळी रक्त रक्ताच्या जागी, लघवी लघवीच्या जागी, संडास संडासच्या जागी अगदी बरोबर पोहोचते. कशी पद्धतशीर सुंदर व्यवस्था केलेली आहे ! आत निसर्ग केवढे मोठे काम करत आहे ! जर डॉक्टरला एक दिवस अन्न पचवायचे काम सोपवले तर तो मनुष्याला मारून टाकेल! आतील पाचकरस टाकायचे, बाईल टाकायचे, असे सर्व काम डॉक्टरवर सोपवले असेल तर डॉक्टर काय करेल ? भूख लागत नाही म्हणून आज पाचक रस जरा जास्त टाकू दे. आता निसर्गाचा नियम कसा आहे की, मरेपर्यंत पुरेल अशा तऱ्हेने तो पाचकरसाची व्यवस्था करतो. डॉक्टरकडे ही व्यवस्था सोपवली तर तो रविवारी पाचकरस जास्त टाकतो, म्हणून बुधवारी काही पचनारच नाही, कारण बुधवारचा हिस्सा पण रविवारीच
टाकला.
निसर्गाच्या हातात कशी सुंदर बाजी आहे ! आणि तुमच्या हातात