________________
वरिष्ठांचा व्यवहार
१५९
नोकर कधी काही फोडत नाही, आपल्या राँग बिलिफ (चुकीच्या मान्यते) मुळे असे वाटते की, हे नोकराने फोडले. वास्तवात फोडणारा दुसरा कोणी आहे. इथे तर निर्दोष व्यक्तीला दोषित ठरवले जाते, नोकर त्या वागणुकीचे फळ देतो, कुठल्या तरी जन्मात.
प्रश्नकर्ता : मग त्यावेळी फोडणारा कोण असतो?
दादाश्री : आम्ही जेव्हा ज्ञान देतो तेव्हा ज्ञानविधीत या बद्दल सविस्तर सांगत असतो. फोडणारा कोण? जग चालवणारा कोण? त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत असतो. खरे तर अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे? भ्रांतीच्या अवस्थेत सुद्धा कुठला आधार घेतला पाहिजे? नोकर तर सिन्सियर आहे, तो मुद्दाम फोडणाऱ्या पैकी नाही.
प्रश्नकर्ता : तो कितीही सिन्सियर असला पण अखेर त्याच्या हातून चहाचा ट्रे पडला मग तो अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही का?
दादाश्री : जबाबदार आहे! पण त्याची जबाबदारी किती ते आपण समजून घेतले पाहिजे. सर्व प्रथम त्याला विचारले पाहिजे की, 'तुला भाजले तर नाही ना?' भाजले असेल तर औषध लावले पाहिजे. मग हळूवार सांगावे की याच्यापुढे अशी घाई करू नकोस, जपून चालत जा.
सत्तेचा दुरुपयोग इथे सत्ता असणारी व्यक्ती सत्तेचा उपयोग आपल्या कनिष्ठांना तुडवण्यासाठी करते. जो सत्तेचा दुरुपयोग करतो त्याची सत्ता त्याच्या हातून निघून जाते, शिवाय पुन्हा मनुष्य जन्मही मिळत नाही. एकच तास जर आपण आपल्या हाताखालच्या माणसाला त्रास दिला तरी आयुष्यभराची कर्म बांधली जातात. विरोध करणाऱ्यांना धमकावले तर गोष्ट वेगळी आहे.
प्रश्नकर्ता : समोरचा आगाव असेल तर त्याच्याशी जशास तसे नको का वागायला?