________________
वरिष्ठांचा व्यवहार
अंडरहेन्डची तर रक्षा करावी प्रश्नकर्ता : दादा, शेठजी माझ्याकडून खूप काम करून घेतात, पगार खूप कमी देतात शिवाय सतत दटावतातही.
दादाश्री : हे हिंदुस्तानातील शेठजी तर पत्नीला देखील धोका देतात. पण शेवटी जेव्हा अंत्ययात्रा निघते तेव्हा तर स्वतःच धोका खातात. हे हिंदूस्तानातील शेठ लोक नोकरांना पिळून काढतात, धड दोन घास खाऊ पण देत नाहीत, नोकरीच्या पगारातून सुद्धा काटछाट करतात. इन्कमटॅक्सवाले पैसे कापून घेतात, तेव्हा तिथे सरळ होतात, पण आजकाल तर इन्कमटॅक्सवाल्यांचेही हे लोक कापून घेतात! (कर भरत नाहीत)
जगात सर्व अंडरहेन्ड (हाताखालची माणसे,नोकर) ला धमकावत असतात. अरे, साहेबांना धमकावून दाखव ना, ते जमले तर तुझा खरा विजय! जगाचा व्यवहारच हा असा आहे. पण भगवंताने तर एकच व्यवहार सांगितला होता की, तुमच्या हाताखाली जी पण माणसं आहेत त्यांचे रक्षण करा. आणि ज्यांनी रक्षण केले ते देव बनलेत. मी लहानपणापासून अंडरहन्डचे रक्षण करत आलो.
आता इथे कोणी नोकर चहा घेऊन आला आणि त्याच्या हातून चहाचा ट्रे पडला, तर लगेच शेठ त्याच्यावर ओरडतील की, 'तुझे हात तुटलेत का? तुला दिसत नाही?' तो तर बिचारा नोकर आहे. वास्तवात