________________
व्यापार, धर्मासकट
१५७
दादाश्री : आपल्या शास्त्रात व्याज घेण्यास हरकत घेतलेली नाही. पण व्याजखाऊ होणे हानिकारक आहे. समोरच्याला दुःख होत नाही तोपर्यंत व्याज घेण्यास हरकत नाही.
काटकसर तर नोबल ठेवा घरात काटकसर कशी असावी? बाहेरून खराब दिसणार नाही अशी काटकसर असावी. काटकसर स्वयंपाकघरात घुसता कामा नये. काटकसरीत उदारपणा असावा. स्वयंपाकघरात काटकसर घुसली तर मन (भाव) बिघडते. मग कोणी पाहुणे आले तरी भाव बिघडेल की तांदूळ वापरले जातील! एखादा खूप उधळा असेल तर आम्ही त्याला 'नोबल' काटकसर करण्यास सांगतो.