________________
व्यापार, धर्मासकट
१५५
ग्राहक आला तर शांतपणे आणि प्रेमाने त्याला माल द्या. दुकानात ग्राहक नसतील तेव्हा देवाचे नाव घेत रहा. तुम्ही तर सारखे इकडे-तिकडे डोकावून कोणी येत आहे का ते पाहत राहता. मनातल्या मनात व्याकूळ होता, 'आजचा दिवस तोट्यात गेला.आजचा सगळा खर्च अंगावर येईल.' असे विचारचक्र चालू ठेवता. स्वत:ही चिडता आणि नोकरावरही रागावता. असे आर्तध्यान आणि रौद्रध्यान करत राहता! जे कोणी गिहाईक येतात ते 'व्यवस्थित शक्ती' च्या हिशोबाने येणार असतात तेच येतात. त्यामुळे त्यात ढवळाढवळ करू नका. दुकानात गिहाईक आले तर देणेघेणे करायचे पण कषाय करू नका. त्यांच्याशी सौजन्याने व्यवहार करावा. दगडाखाली हात अडकला असेल तर आपण दगडावर हातोडा मारतो का? नाही ना? उलट तिथे तर हळूच हात काढून घेतो. त्यात कषायाचा वापर केला तर वैर बांधले जाईल, आणि एका वैरामधून अनंत वैर निर्माण होतील. या शत्रुत्वामुळेच जग उभे झाले आहे, या संसाराचे मूळ कारण हेच आहे.
प्रामाणिकता, देवाचे लायसन्स प्रश्नकर्ता : आजकाल प्रामाणिकपणे धंदा करायला गेलो तर जास्त अडचणी येतात, असे का?
दादाश्री : प्रामाणिकपणे काम केले तर एकच अडचण येईल, पण अप्रामाणिकपणे काम कराल तर दोन प्रकारच्या अडचणी येतील. प्रामाणिकपणाच्या अडचणीतून सुटता येईल परंतु अप्रामाणिकपणाच्या अडचणीतून सुटका करून घेणे अवघड आहे. प्रामाणिकपणा म्हणजे परमेश्वराचे मोठे लायसन्स आहे, त्याच्यावर कोणीच आरोप करू शकत नाही. तुम्हाला हे लायसन्स फाडून टाकावेसे वाटते का?
...नफा-तोट्यात, हर्ष-शोक कशासाठी? व्यापार मन बिघडवून केलात तरी नफा ६६,६१६ रुपयेच होणार