________________
व्यापार, धर्मासकट
१५३
जोखीमेत पडूच नका. या समुद्रात प्रवेश केल्यानंतर तिथून बाहेर पडणेच
उत्तम.
आम्ही व्यापार कशा पद्धतीने करतो हे माहित आहे का? व्यापाराची बोट समुद्रात सोडताना आधी पूजाविधी करून मग बोटीच्या कानात सांगतो, 'तुला जेव्हा बुडायचे असेल तेव्हा बुड, पण तू बुडावी अशी माझी इच्छा नाही.' मग सहा महिन्यात बुडो की दोन वर्षात बुडो. तेव्हा आम्ही एडजस्टमेन्ट करून घेतो. चला सहा महिने तरी टिकली! व्यापार म्हणजे हे टोक किंवा ते टोक. आशेचा महाल निराशा दिल्याशिवाय राहत नाही. संसारात वीतराग राहणे खूप कठीण आहे. पण आमची ज्ञानकला आणि बुद्धिकला जबरदस्त असते त्यामुळे संसारात वीतराग राहता येते.
ग्राहकांचे पण नियम आहेत प्रश्नकर्ता : दुकानात जास्त ग्राहक येवोत म्हणून मी दुकान लवकर उघडतो आणि उशीरा बंद करतो, हे बरोबर आहे ना?
दादाश्री : ग्राहकांना आकर्षित करणारे तुम्ही कोण? लोक ज्या टाईमाला दुकान उघडत असतील त्याच टाईमाला तुम्ही पण उघडा. लोक सात वाजता उघडतात आणि तुम्ही साडे नऊ वाजता उघडलेत तर तेही चुकीचे म्हटले जाईल. लोक जेव्हा दुकान बंद करतात तेव्हा तुम्हीही बंद करून घरी जावे. व्यवहार काय सांगतो की, लोक काय करतात ते तुम्ही पाहा. लोक झोपतात त्यावेळी तुम्ही पण झोपा. रात्री दोन वाजेपर्यंत धुमाकूळ घालता, ही कोणासारखी गोष्ट आहे ! जेवल्यानंतर विचार करता का की हे कसे पचेल? त्याचे फळ सकाळी मिळूनच जाते ना? असेच व्यापाराचे सुद्धा आहे.
प्रश्नकर्ता : दादा, सद्या दुकानात बिलकूल ग्राहक नसतात, मग मी काय करू?