________________
१५२
क्लेश रहित जीवन
दादाश्री : कापसाच्या व्यापारातील नुकसान भरपाई किराणा दुकान टाकून निघत नाही. व्यापारातील झालेल्या नुकसानाची भरपाई व्यपारातूनच भरून निघते. नोकरीतून होत नाही. कॉन्ट्रॅक्ट व्यवसायातील नुकसान पानाच्या टपरी मधून भरून निघेल का? ज्या बाजारात नुकसान झाले त्याच बाजारातून नुकसान भरून निघेल. तिथेच त्याचे औषध असते.
आपण मनात कायम एकच भाव नक्की करावा की आपल्याकडून कोणत्याही जीवाला किंचितमात्रही दुःख होता कामा नये. संपूर्ण कर्ज फेडले जावे, असा आपला शुद्ध भाव असावा. तुमची दानत साफ असेल तर उशीरा का होई ना संपूर्ण कर्ज फेडू शकाल. लक्ष्मी म्हणजे अकरावा प्राण आहे. म्हणून कुणाचीही लक्ष्मी आपल्याजवळ राहता कामा नये. आपली लक्ष्मी कुणाजवळ राहिली तर हरकत नाही. पण कायम एकच ध्येय ठेवले पाहिजे की मला कर्जाची एक-एक पै चुकती करायचीच आहे. ध्येय लक्षात ठेवूनच खेळ खेळा. खेळ खेळा पण खेळाडू बनू नका. खेळाडू झालात तर तुम्ही संपलेच समजा!
...जोखीम ओळखून निर्भय राहावे प्रत्येक धंद्यात उदय-अस्त (चढ-उतार) असतातच. खूप डास असले तरी रात्रभर झोपू देत नाहीत आणि फक्त दोनच असले तरी रात्रभर झोपू देणार नाहीत! म्हणून तुम्ही म्हणा, 'हे डासमय दुनिया! दोनच जर झोपू देत नाहीत तर मग सगळेच एकदम या ना.' हा नफा-तोटा हा पण डासांसारखाच आहे.
नियम कसा ठेवावा? समुद्रात शक्यतो उतरायचे नाही! पण उतरायची वेळ आलीच तर घाबरायचे नाही. जोपर्यंत तुम्ही निर्भय, तोपर्यंत अल्लाह तुमच्याजवळ. तुम्ही जर घाबरलात तर अल्लाह म्हणेल, जा त्या ओलीयाकडे! देवासाठी तर रेसकोर्स आणि कपड्याचे दुकान दोन्हीही सारखेच. पण तुम्हाला जर मोक्षाला जायचे असेल तर या