________________
[६] व्यापार, धर्मासकट
आयुष्य कशासाठी खर्च झाले? दादाश्री : हा व्यापार तुम्ही कशासाठी करता? प्रश्नकर्ता : पैसे कमावण्यासाठी. दादाश्री : पैसे कशासाठी कमावता? प्रश्नकर्ता : माहीत नाही.
दादाश्री : ही कशासारखी गोष्ट आहे ? एक मनुष्य दिवसभर इंजिनच चालवित राहतो, पण कशासाठी? माहीत नाही. इंजिनला पट्टाच जोडलेला नाही, फक्त फिरवतच राहतो. तसेच तुमचेही आहे. जीवन कशासाठी जगायचे आहे ? फक्त पैसे कमावण्यासाठी? प्रत्येक जीव सुख शोधत असतो. सर्व दुःखांपासून मुक्ती कशी मिळेल हे जाणून घेण्यासाठीच जीवन जगायचे आहे.
विचार करा, चिंता नाही प्रश्नकर्ता : धंद्याची खूप काळजी वाटते, खूपच अडचणी येतात.
दादाश्री : काळजी वाटायची सुरुवात झाली की समजायचे आपले कार्य बिघडणार आहे. जास्त काळजी वाटत नसेल तर समजायचे की