________________
१४८
क्लेश रहित जीवन
मारल्याने सुटेल असा नाही. त्यामुळे या संसारातून सुटलो तर खूप बरे होईल अशी भावना मनात बाळगत राहा. अनंत जन्मांपासून सुटण्याची भावना निर्माण झाली पण मार्ग दाखविणारा कोणी जाणकार हवा की नको? मार्ग दाखविणारे 'ज्ञानीपुरुष' हवेत.
जशी चिकटपट्टी जर शरीरावर चिकटवली आणि मग ती ओढली तरी ती सहज निघत नाही. तिच्याबरोबर अंगावरचे केस पण ओढले जातात. तसाच हा संसार सुद्धा चिकट आहे. 'ज्ञानीपुरुष' औषध देतील तेव्हाच संसार सुटू शकेल. हा संसार सोडला तर सुटेल असा नाही. ज्यांनी संसार सोडला आहे, त्याग केला आहे ते त्यांच्या कर्माच्या उदयामुळे घडून आलेली गोष्ट आहे. प्रत्येकाला आपापल्या कर्माच्या आधारावर त्यागधर्म किंवा गृहस्थधर्म मिळत असतो. समकित प्राप्त होते तेव्हापासून सिद्धदशा प्राप्त होते.
हे सर्व तुम्ही चालवत नाही. क्रोध, मान, माया. लोभ, कषायच हे सगळेकाही चालवतात. कषायांचेच राज्य आहे ! 'मी कोण आहे' याचे जेव्हा भान येते तेव्हा कषाय निघून जातात. क्रोध झाल्यावर पश्चाताप होतो पण जोपर्यंत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिक्रमण करता येत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. प्रतिक्रमण करता आले तर सुटका होईल.
हे कषाय घटकाभर देखील चैन पडू देत नाहीत. मुलाच्या लग्नाच्यावेळी तुम्ही मोहाने घेरलेले असता! तेव्हा मोहात मूर्छित असतात, एरवी मात्र दिवसभर उकळत्या चहासारखी बैचेन अवस्था असते या माणसांची. तरीही मनात वाटते की, 'मी' तर थोरली जाऊ आहे ना! हा तर व्यवहार आहे, फक्त नाटकच करायचे आहे. हा देह सुटला म्हणजे दुसऱ्या (जन्मात) नाटकातील भूमिका निभावायची आहे. ही नाती खरी नाहीत. हे तर संसारी ऋणानुबंध आहेत. हिशोब संपल्यावर मुलगा आईवडिलांबरोबर जात नाही.
'याने माझा अपमान केला!' अरे, बाबा सोड ना आता. अपमान