________________
क्लेश रहित जीवन
वळला. एडजस्टमेन्ट करता आले, त्याचेच नाव ज्ञान. जो एडजस्टमेन्ट शिकला तो ( भवसागरातून) तरुन गेला. जे भोगायचे आहे ते तर भोगावेच लागेल पण एडजस्टमेन्ट घेता आली त्याला त्रास होत नाही आणि हिशोब संपत जातात. सरळ माणसाबरोबर कुणीही एडजस्ट होईल पण वाकड्याकठीण-कडक प्रकृतीच्या माणसाबरोबर, सगळ्यांबरोबरच एडजस्ट होणे जमले तर काम फत्ते झाले समजा. मुख्य वस्तू एडजस्टमेन्ट आहे. 'हो' म्हटल्याने मुक्ती आहे. आणि आपण 'हो' जरी म्हटले तरीही 'व्यवस्थित' च्या बाहेर काही होणार आहे का ? पण 'नाही' म्हटले की मग त्रासच त्रास !
१४६
घरात नवरा-बायको दोघांनी निश्चय केला की मला एडजस्ट व्हायचे आहे. तर दोघांचेही प्रश्न सुटतील. एकाने जास्त ताणले तर दुसऱ्याने एडजस्ट व्हायचे, तर प्रश्न सुटेल. एका व्यक्तीचा हात दुखत होता, त्याने दुसऱ्या कोणाला सांगितले नाही. त्याने स्वतःच्याच दुसऱ्या हाताने हात चेपून, दुसऱ्या हाताने एडजस्ट केले! असे एडजस्ट होता आले तर समस्या सुटतील. मतभेदाने समस्या सुटत नाही. मतभेद पसंत नसतील, तरी होतातच ना ? समोरचा जास्त ओढाताण करीत असेल तर तुम्ही आग्रह सोडून द्या आणि पांघरून घेवून झोपून जा. जर सोडले नाही आणि दोघेही आपल्या मतासाठी भांडतच बसाल तर दोघांनाही झोप लागणार नाही आणि रात्रभर त्रास होत राहील. व्यवहारात, व्यापारात, भागीदारीत आपण सांभाळून घेतोच ना ! मग या संसाराच्या भागीदारीत सांभाळायला नको का ? संसार म्हणजे भांडणाचे संग्रहस्थान आहे. कुणाकडे दोन आण्याची कुणाकडे चार आण्याची आणि कुणाकडे सव्वा रुपयापर्यंतही (मर्यादे पलीकडे) भांडणे होतात !
इथे घरात ‘एडजस्ट' होता येत नाही आणि आत्मज्ञानाचे शास्त्र वाचत बसतात! अरे, ते ठेवा बाजूला, प्रथम हे शिका. घरात तर एडजस्ट होता येत नाही. असे आहे हे जग ! म्हणून मोक्षाचे काम करुन घेण्यासारखे
आहे.