________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१४५
समोरच्याला फोन पोहोचला पाहिजे, त्याच्या आत्म्यापर्यंत तुमचे भावना पोहोचली पाहिजे. त्या आत्म्याजवळ आपण चूक केली आहे असे कबूल केले पाहिजे. म्हणजेच त्यासाठी मोठे प्रतिक्रमण केले पाहिजे.
प्रश्नकर्ता : समोरच्या माणसाने आपला अपमान केला तरीदेखील आपण त्याचे प्रतिक्रमण करायचे?
दादाश्री : त्याने अपमान केला तरच प्रतिक्रमण करायचे, तुम्हाला तो मान देतो तेव्हा करायचे नाही. प्रतिक्रमण केलेत तर तुम्हाला समोरच्यावर द्वेषभाव होणारच नाही. एवढेच नाही तर त्याच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडेल. तुमच्यावर द्वेषभाव होणार नाही ही तर पहिली स्टेप समजायची, पण नंतर तुमची भावनाही त्याच्यापर्यंत पोहोचते.
प्रश्नकर्ता : त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचते?
दादाश्री : हो, निश्चितच पोहोचते. नंतर तो आत्मा त्याच्या पुद्गलला पण सांगतो की, 'भाऊ, तुझा फोन आला आहे.' आपले जे प्रतिक्रमण आहे ते अतिक्रमणासाठी आहे, क्रमणासाठी (सामान्य व्यवहारासाठी) नाही.
प्रश्नकर्ता : त्यासाठी बरेच प्रतिक्रमण करावे लागतील का?
दादाश्री : जेवढ्या स्पीडमध्ये आपल्याला घर बांधायचे आहे त्यानुसार मजूर वाढवावे लागतील. असे आहे, की या बाहेरच्या लोकांचे प्रतिक्रमण नाही झाले तरी चालेल, पण तुमच्या जवळच आणि तुमच्या आसपास राहणाऱ्या घरच्या लोकांचे जास्त प्रतिक्रमण करावेत. कुटुंबातील लोकांसाठी भावना करावी की माझ्याबरोबर जन्म घेतला आहे, माझ्यासोबत राहत आहेत, ते पण कधीतरी या मोक्षमार्गावर येवोत.
...तेव्हा संसाराचा अस्त होईल ज्याला एडजस्ट होण्याची कला जमली तो संसाराकडून मोक्षाकडे