________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१४३
पोलिसाला कशाला बोलावतोस? तू जिवंत आहसे की मेला आहेस? पोलीसाचीच मदत घ्यायची असेल तर नवराच होऊ नकोस.
घरचा मालक 'हाफ राऊंड' चालतच नाही. तो तर ऑल राऊंडच पाहिजे. त्याला कलम, कडछी, बरछी, तरवू, तांतरवू आणि तस्करवू (लिहिणे-वाचणे, स्वयंपाक करणे, प्रसंगी शस्त्र चालवणे, पोहता येणे, चोरी करणे, वाद-विवाद संभाषण करता येणे) या सहाही कला अवगत पाहिजेत. ज्याला या सहा गोष्टी येत नाहीत तो पुरुष नाही. कितीही निर्लज्ज माणूस समोर आला तर त्याच्याशी कसे वागावे ते जमले पाहिजे. अगदी डोके शांत ठेवून, चिडून चालणार नाही.
ज्याला स्वत:वर विश्वास आहे त्याला या जगात सर्व काही मिळू शकेल. पण हा विश्वासच नाही ना! कित्येकांचा तर, 'आपली बायको आपल्याबरोबर राहील की नाही? हाही विश्वास उडून गेलेला असतो. पाच वर्षे तरी निभावेल की नाही?' असे वाटत असते. 'अरे इतकाही विश्वास नाही? विश्वास तुटला म्हणजे संपले. विश्वासात अनंत शक्ती आहे. अज्ञानतेत का होईना पण विश्वास हवाच. 'माझे कसे होईल' असे वाटले म्हणजे संपले! या काळात लोक फारच गोंधळलेले आहेत. कोणी धावत-धावत आला आणि त्याला तुम्ही विचारले की तुझे नाव काय आहे ? तर तो एकदम गांगरून जाईल.
चुकांमुळेच चुका करणारे भेटतात प्रश्नकर्ता : मी बायकोबरोबर एडजस्ट होण्याचा खूपच प्रयत्न करतो पण मला एडजस्ट होता येतच नाही.
दादाश्री : सगळे हिशोबानुसार आहे! वाकड्या पेचासाठी वाकडा नट असतो. तिथे नट सरळ फिरवून कसे चालेल? तुम्हाला वाटते की या स्त्रिया अशा का असतात? पण त्या तर तुमच्या काउन्टरवेट असतात. जितके तुम्ही वाकडे तितक्या त्या वाकडया. म्हणून तर सगळे 'व्यवस्थित' आहे असे म्हटले ना?