________________
व्यापार, धर्मासकट
१५१
कार्य बिघडणार नाही. चिंता-काळजी कार्याला अवरोधक (अडचणकारक) आहे. चिंतेमुळे धंद्याचे मरण ओढावेल. ज्यात चढ-उतार होते त्यालाच धंदा म्हणतात. हे पुरण-गलन आहे. पुरण झालेले गलन झाल्याशिवाय राहणारच नाही. या पुरण-गलनात आपली काहीच संपत्ती नाही, आणि जी आपली संपत्ती आहे त्यातून काहीच पुरण-गलन होत नाही! इतका चोख व्यवहार आहे !! हे तुमच्या घरात तुमची बायको-मुले सगळेच तुमचे भागीदार आहेत ना?
प्रश्नकर्ता : सुख-दुःखात तर भागीदार आहेत.
दादाश्री : तुम्ही तुमच्या बायको-मुलांचे पालक म्हटले जातात. फक्त पालकानेच का म्हणून काळजी करावी? आणि घरची माणसे तर उलट तुम्हाला म्हणतात ना की, आमची काळजी करू नका.
प्रश्नकर्ता : चिंतेचे स्वरूप काय आहे? जन्माला आलो तेव्हा तर चिंता नव्हती, मग आता आली कुठून?
दादाश्री : जसजशी बुद्धी वाढते तसतसा संतापही वाढत जातो. जन्मले तेव्हा बुद्धी होती का? व्यापार-धंद्यासाठी विचार करण्याची गरज आहे. पण त्यापुढे गेलात तर सगळे बिघडते. व्यापार-धंद्यासाठी दहापंधरा मिनिटे विचार करणे ठीक आहे पण त्यापुढे जाऊन सतत विचार चक्र चालूच राहिले तर ते नॉर्मालीटीच्या बाहेर गेले म्हटले जाईल. तेव्हा मग विचार करणे बंद करा. धंद्याचे विचार तर येतील, पण त्या विचारात तन्म्याकार झालात तर त्या विचारांचे ध्यान उत्पन्न होईल आणि त्यामुळे काळजी सुरु होईल. ते मग प्रचंड नुकसान करते.
कर्जफेडीच्या बाबतीत दानत साफ ठेवा
प्रश्नकर्ता : व्यापारात खूप तोटा झाला आहे तर काय करू? व्यापार बंद करू की दुसरा व्यवसाय करू? कर्ज खूप झाले आहे.