________________
१५४
क्लेश रहित जीवन
दादाश्री : ही लाईट गेली तर, 'लाईट केव्हा येईल, केव्हा येईल' असे केल्याने ती लवकर येते का? तेव्हा तुम्ही काय करता?
प्रश्नकर्ता : एक-दोन वेळा फोन करतो किंवा स्वतः सांगायला जातो.
दादाश्री : शंभर वेळा फोन करता का? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : ही लाईट गेली तेव्हा आपण आरामशीर गात होतो आणि मग ती आपोआपच आली ना?
प्रश्नकर्ता : म्हणजे आपण नि:स्पृह (विरक्त) व्हायला हवे
का?
दादाश्री : नि:स्पृह होणे हाही गुन्हा आहे आणि सस्पृह होऊन जाणे हाही गुन्हा आहे. 'लाईट आली तर चांगले होईल' एवढा भाव ठेवावा. सस्पृह-निस्पृह राहण्याचे सांगितले आहे. 'ग्राहक आले तर बरे होईल' असा भाव मनात बाळगा. पण विनाकारण उपद्व्याप करू नका. रेग्युलारिटी असावी आणि भाव बिघडवू नये हा रिलेटिव्ह पुरुषार्थ आहे. गिहाईक आले नाहीत तरी व्याकूळ व्हायचे नाही आणि एखाद्या दिवशी गिहाईकांच्या झुंडी आल्या तरी सगळ्यांचे समाधान होईल असे त्यांच्याशी वागा. हे तर एखाद्या दिवशी गिहाईक आले नाही तर लगेच शेठजी नोकरावर खेकसतात! नोकराच्या जागी तुम्ही असाल तर तुम्हाला कसे वाटेल? काय वाटले असते? तो बिचारा नोकरी करायला येतो आणि तुम्ही त्याच्यावर सतत खेकसतच राहिलात तर नोकर असल्या कारणाने तो सहन तर करेल पण मनात वैर बांधेल. नोकराला रागावू नका. तो पण माणूसच आहे. त्याला घरी पण दुःखं आणि इथे पण तुम्ही शेठ असल्यामुळे दडपणात ठेवाल, तर तो बिचारा कुठे जाईल? त्या बिचाऱ्यावर थोडा तर दयाभाव ठेवा.