________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१४७
'ज्ञानी' सोडवतात संसार जाळ्यातून प्रश्नकर्ता : या संसाराच्या वहीखात्यात तर सर्वत्र तोटाच दिसतो. तरीदेखील कधी कधी नफा आहे असे का वाटते?
दादाश्री : ज्या खात्यात तोटा आहे असे वाटते, तिथे जर कधी नफा दिसला तर ते वजा करून टाका. हा संसार इतर कुठल्याच गोष्टीतून उत्पन्न झालेला नाही, गुणाकारानेच झालेला आहे. मी तुम्हाला जी रक्कम दाखवतो त्याच्याने तुम्ही भागाकार कराल म्हणजे शिल्लक काही उरणार नाही. हे शिकता आले तर शिका, नाही तर 'मला दादांच्या आज्ञांचे पालन करायचेच आहे, संसाराचा भागाकार करायचाच आहे.' असे ठरवले तेव्हापासून भागाकार झालाच समजा!
नाहीतर हे जीवन व्यतीत करणे सुद्धा खूप कठीण झाले आहे. नवरा येईल आणि म्हणेल की, 'माझ्या छातीत दुखत आहे.' मुलं येतील आणि म्हणतील 'आम्ही नापास झालो.' नवऱ्याच्या छातीत दुखत आहे असे ऐकल्यावर तिच्या मनात विचार येईल की, नवऱ्याचा 'हार्टफेल' झाला तर काय होईल? असे विचार माणसाला चारीबाजूंनी घेरतात, चैनच पडू देत नाहीत.
ज्ञानी पुरुष या संसारच्या जाळ्यापासून सुटण्याचा मार्ग दाखवितात, मोक्षाचा मार्ग दाखवितात. रस्ता चुकला तर परत रस्त्यावर आणतात. मग आपल्यालाही जाणीव होते की, आपण या सर्व संकटातून मुक्त झालो!
अशा भावनेने सोडवणारे मिळतातच ही सगळी परसत्ता आहे. खातो, पितो, मुलांची लग्ने लावतो या सगळ्या गोष्टी परसत्तेत आहेत. त्यात आपली सत्ता (अधिकार) नाही. आत जे कषाय (क्रोध, मान, माया, लोभ) दडले आहेत, त्यांची सत्ता आहे. ज्ञानी पुरुष 'मी कोण आहे ?' याचे ज्ञान देतात तेव्हा या कषायांतून, या सर्व जंजाळातून सुटका होते. हा संसार सोडल्याने किंवा धक्का