________________
१४४
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : सगळेच आम्हाला सरळ करण्यासाठीच आले आहेत असेच वाटते.
दादाश्री : तुम्हाला सरळ करायलाच हवे. सरळ झाल्याशिवाय या जगात जमणार कसे? सरळ झाला नाहीत तर बाप कसे बनू शकाल? सरळ झालात तर बाप बनायला योग्य.
शक्ती विकसित करणारे हवेत म्हणजेच या स्त्रियांचा दोष नाही, स्त्रिया तर देवी समान आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आत्माच आहे, फक्त देहाचा फरक आहे. 'डिफरन्स ऑफ पॅकिंग!' स्त्री हा एक प्रकारचा परिणाम आहे, आणि म्हणून त्या परिणामाचा आत्म्यावर परिणाम दिसतो.त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये. तसे झाले की बरोबर. स्त्री तर शक्ती आहे. या देशात अनेक स्त्रीया मोठमोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. आणि ज्या स्त्रीने धर्मक्षेत्रात प्रवेश केला ती तर कशी (शक्तीमान) असेल?! या क्षेत्रातून तर ती साऱ्या जगाचे कल्याण करु शकते. स्त्रीमध्ये जगाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. तिच्यात स्वतःच्या कल्याणाबरोबर दुसऱ्याचेही कल्याण करण्याची शक्ती आहे.
प्रतिक्रमणाने सगळे हिशोब मिटतील प्रश्नकर्ता : कित्येक जण स्त्रियांना कंटाळून घर सोडतात हे योग्य आहे का?
दादाश्री : नाही. पळून जाण्यात काय अर्थ आहे ? तुम्ही परमात्मा आहात. तुम्हाला पळपुटे व्हायची काहीच गरज नाही. आपण तिचा समभावे निकाल करावा.
प्रश्नकर्ता : निकाल तर करायचा आहे पण कसा करावा? हे सर्व मागील जन्माच्या कर्मामुळे घडत आहे, असा मनात भाव ठेवायचा का?
दादाश्री : फक्त एवढ्यानेच भागणार नाही. निकाल म्हणजे