________________
१४२
क्लेश रहित जीवन
पाहा. झोपण्याची, उठण्याची अशी आमची सगळीच नॉर्मालिटी असते. आम्ही जेवायला बसलो आणि मागाहून कोणी ताटात मिठाई वाढली तर मी त्यातली थोडीशी मिठाई घेतो पण मग भाजी थोडी कमी करतो. म्हणजे जेवणाचे प्रमाण बदलत नाही. तुम्हाला इतके सर्व करण्याची गरज नाही. तुम्ही उशिरा उठत असाल तर बोलत रहा की माझ्याकडून ‘नॉर्मालिटत' राहिले जात नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला टोकत राहिले पाहिजे की, 'मला लवकर उठायला हवे.' असे टोकल्याने फायदा होईल. यालाच पुरुषार्थ म्हटले आहे. रात्री झोपताना सतत बोलत राहा की 'उद्या लवकर उठायचे आहे, उद्या लवकर उठायचे आहे.' याचा फायदा होईल. पण जबरदस्तीने उठायचा प्रयत्न केलात तर मनाला खूप त्रास होईल.
शक्ती किती कमी झाल्या
प्रश्नकर्ता : 'पतीच परमेश्वर आहे' असे म्हणणे चुकीचे आहे ? दादाश्री : आजकालच्या नवऱ्यांना परमेश्वर मानले तर ते वेडे होतील!
एक नवरा त्याच्या बायकोला म्हणाला, 'तुझ्या डोक्यावर निखारे ठेव आणि त्याच्यावर भाखरी भाज!' अगोदरच माकड आणि त्याला दारू पाजली तर त्याची काय दशा होईल ?
पुरुष तर कसा असतो ? पुरुष असे तेजस्वी असतात की, हजार स्त्रिया असल्या तरी त्याच्यापुढे थरथरतील ! त्याला पाहता क्षणीच थरथरतील! आजकालचे पुरुष असे आहेत की त्यांच्या बायकोचा हात कोणी पकडला तर त्याला विनंती करतात, 'अरे सोड, सोड माझी बायको आहे, माझी बायको आहे.' अरे गाढवा तू त्याला विंनती करतोस ? किती मूर्ख आहेस तू? त्याला मार, त्याचा गळा पकड, चाव त्याला. त्याच्या पाया काय पडतोस? आपणहून सोडेल असा तो माणूस नाही. मग हा ‘पोलिस, पोलिस, वाचवा, वाचवा' असे ओरडतो. अरे तू नवरा असून