________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१४१
करतील! याला प्रेम म्हणणार? हे तर संडास आहे, जसे संडास बदलतात तसे! जे गलन आहे त्याला संडास म्हणतात. प्रेमात तर सर्वस्व अर्पण केले जाते.
प्रेम म्हणजे संपूर्ण दिवस त्यांचीच आठवण आणि त्यांचीच ओढ. लग्नाचा परिणाम दोन प्रकारे होतो. कधी-कधी पूर्ण भरभराट, तर कधी-कधी पूर्ण सत्यानाश होतो. जे प्रेम जास्त उफाळते ते नंतर संपून जाते. जे उफाळते ती आसक्ती आहे. म्हणून जिथे जास्त प्रेमाचा दिखावा असेल त्यापासून दूर रहा. ओढ तर आतून असायला हवी. बाहेरचे खोके (शरीर) खराब झाले, सडले तरीही प्रेम जसेच्या तसेच रहाते. हा तर हात भाजला असेल आणि नवऱ्याला म्हटले की जरा धुवून देता का? तर नवरा म्हणेल 'नाही, मला बघवत नाही.' अरे इतक्या दिवस तर हात कुरवाळत बसत होतास आणि आज काय झाले? ही घृणा कशी चालेल? जिथे प्रेम आहे तिथे तिरस्कार नाही आणि जिथे तिरस्कार आहे तिथे प्रेम नाही. संसारी प्रेम असे हवे की जे एकदम वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. नॉर्मालिटीत असले पाहिजे. ज्ञानींचे प्रेम कधीही कमी-जास्त होत नाही. ते प्रेम तर निराळेच असते, त्यास परमात्म प्रेम म्हणतात.
नॉर्मालिटी, शिकण्यासारखी प्रश्नकर्ता : व्यवहारात 'नॉर्मालिटी' कशी ओळखायची?
दादाश्री : सगळेजण तुला म्हणत असतील की, 'तू उशीरा उठतेस, उशीरा उठतेस.' तर तुला हे समजायला नको की आपली 'नॉर्मालिटी' तुटली आहे. रात्री अडीच वाजता उठून तू चकरा मारू लागलीस तर सगळेजण म्हणणारच ना की, 'इतक्या लवकर कशाला उठलीस?' इथे पण 'नॉर्मालिटी' तुटली असे समजून घे. नॉर्मालिटी सगळ्यांना एडजस्ट होईल अशी आहे. खाण्यातही नॉर्मालिटी पाहिजे, जर जास्त खाल्ले तर झोप येत राहते. आमची खाण्याची, पिण्याची अशी सगळीच नॉर्मालिटी