________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१३९
शब्दही बोलू नये. कारण ज्ञानीची वाणी कशी असते? तर परेच्छानुसार असते. दुसऱ्यांच्या इच्छेनुसार ते बोलतात. त्यांना का बोलावे लागते? तर दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते बोलतात. पण इतर जण जेव्हा बोलतात तेव्हा ऐकणारे अस्वस्थ होतात, भयंकर पाप लागते. इतरांनी मुळीच बोलू नये. थोडे जरी बोलले तरी ती कटकट म्हटली जाते. बोलणे असे हवे की ते सतत ऐकावेसे वाटेल. रागावले तरी ते ऐकायला गोड वाटेल. इथे मात्र तुम्ही थोडे जरी बोलायला सुरुवात केली तर लगेच मुले म्हणतात 'काका आता बस, पुरे तुमची कटकट. विनाकारण ढवळाढवळ करू नका.' रागावलेले केव्हा योग्य? पूर्वग्रह नसेल तेव्हा. पूर्वग्रह म्हणजे मनात आधीची आठवण असतेच की काल हा असा वागला होता, भांडला होता, हा तर असाच आहे. घरात जो भांडतो त्याला भगवंताने मूर्ख म्हटले आहे. कोणाला दुःखं जरी दिले तरीही ती नर्कात जाण्याची निशाणी आहे.
संसार निभावण्याचे संस्कार-कुठे? मानव जात सोडली तर इतर कोणीही नवरेपणा गाजवत नाही. अरे, हल्ली तर घटस्फोट देखील घेतात ना? वकिलाला सांगतो 'तुला हजार ,दोन हजार रुपये देतो, पण मला घटस्फोट मिळवून दे.' मग वकीलही म्हणेल की, 'हो देतो मिळवून' अरे, तू स्वतःच घे ना घटस्फोट, दुसऱ्यांना का घटस्फोट मिळवून देतोस?
जुन्या काळातील एका म्हाताऱ्या आजीची ही गोष्ट आहे ती नवऱ्याचे तेरावे करत होती. 'तुझ्या काकांना हे आवडत असे, ते आवडत असे.' असे करत-करत त्या पाटावर वस्तू मांडत होत्या. मी त्यांना म्हणालो, 'काकी! तुम्ही तर काकांशी रोज भांडायच्या. काका पण तुम्हाला पुष्कळदा मारायचे. मग हे आता कशाला?' त्यावर काकी म्हणाल्या, 'पण तुझ्या काकांसारखा नवरा मला पुन्हा मिळणार नाही.' हे आपले हिंदुस्तानी संस्कार!