________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१३७
ती व्यक्ती पुढच्या जन्मी तुम्हाला नवऱ्याच्या रुपात किंवा सासूच्या रुपात आयुष्यभर त्रास देत राहील! न्याय तर हवा की नको? हे भोगावेच लागेल. तुम्ही कुणाला दुःख दिले तर तुम्हाला आयुष्यभर दुःख मिळेल. फक्त एक तास जरी छळले तरी त्याचे फळ आयुष्यभर मिळेल. मग तुम्ही उगाचच तक्रार करत असता की 'माझी बायको माझ्याशी अशी का वागते?' आणि बायकोला ही असे वाटते की, माझ्याकडून असे का वागले जाते?' तिला पण वाईट वाटते, पण काय करणार? मग मी त्यांना विचारले की, तुम्ही बायकोला पसंत केले होते की बायकोने तुम्हाला पसंत करून आणले होते? तेव्हा ते म्हणाले की, 'मी बायकोला पसंत करून आणले होते.' मग त्या बिचारीचा काय दोष? तुम्हीच तिला घेऊन आलात आणि आता ती तुमच्या अपेक्षेनुसार निघाली नाही, त्याला ती तरी काय करणार? ती कुठे जाणार? काही बायका तर नवऱ्याला मारतात देखील. पतिव्रता स्त्रीला तर पत्नी पतीला मारते हे ऐकूनच पाप लागल्यागत वाटते.
प्रश्नकर्ता : जो पुरुष मार खातो त्याला बायल्या म्हणायचे का?
दादाश्री : असे आहे, मार खाणे म्हणजे काही पुरुषाची निर्बळता नाही पण ते त्याचे ऋणानुबंधच तसे असतात. बायको दुःख देण्यासाठीच भेटलेली असते, म्हणून ती हिशोब चुकते करणारच.
वेडा अहंकार, तर भांडण-तंटे करवितो संसार व्यवहारात भांडण-तंट्याचे नावच काढायचे नाही, तो एक रोग आहे. भांडणे हा अहंकार आहे, उघड-उघड अहंकार आहे. त्यास वेडा अहंकार म्हणतात. त्या वेड्या अहंकारामुळे असे वाटते की माझ्याशिवाय चालणार नाही. कुणाला रागावल्यामुळे तर उलट आपल्याला ओझे वाटते, डोकेच दुखायला लागते. भांडायची कुणाला हौस असते का?
घरात जर कोणी विचारले, सल्ला मागितला तरच उत्तर द्यावे.