________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१३५
म्हणून त्यांना आश्रित म्हणतात. आश्रितांना दु:ख नसते. यांनाच (मनुष्यजातीलाच) सगळे दुःख असते !
माणसे विकल्पी सुखाच्या मागे धावतात. पण जेव्हा बायको भांडण करते तेव्हा या सुखाविषयी कळते की हा संसार उपभोगण्यासारखा नाही. पण हा तर लगेच मूर्छित होऊन जातो! मोहामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणत मार खातो त्याचेही त्याला भान राहत नाही.
बायको रुसलेली असते तोपर्यंत 'या अल्लाह परवर दिगार' करतो (देवाची आठवण करतो). आणि बायको परत बोलू लागली की म्हणजे मियाँभाई खुश! मग अल्लाह वगैरे सगळेकाही एका बाजूला! किती कटकटी!! असे कधी दु:ख दूर होते का? तू थोडा वेळ अल्लाहजवळ बसला म्हणून काय दुःख संपते? जितका वेळ तिथे बसशील तितका वेळ आतील आग शांत होईल. पण मग तिथून उठलास की आग परत सुरु ! निरंतर प्रकट अग्नी आहे, घटकाभर पण सुख मिळत नाही! जोपर्यंत शुद्धात्मा स्वरूप प्राप्त होत नाही, स्वत:च्या दृष्टीत 'मी शुद्ध स्वरूप' आहे, असे भान होत नाही तोपर्यंत ही शेगडी पेटलेलीच राहणार. मुलीच्या लग्नाच्यावेळी देखील आत आग चालूच असते! सतत संतापच असतो! संसार म्हणजे काय? तर जाळे. या शरीराचा विळखा देखील एक जाळेच आहे. जाळे कोणाला आवडेल का? पण जाळे आवडते हेही एक आश्चर्यच म्हटले आहे ना! माश्यांची जाळ वेगळी आणि ही जाळ वेगळी! माश्यांच्या जाळ्याला तर कापून बाहेर निघता येते. पण यातून निघताच येत नाही. थेट तिरडी निघेल तेव्हाच बाहेर पडता येईल!
...त्याला तर लटकता सलाम यात सुख नाही असे समजावे तर लागेल ना? नवरा अपमान करतो, बायको अपमान करते, मुले अपमान करतात! हा तर सगळा नाटकीय व्यवहार आहे, पण शेवटी यांच्यातील कोणी सोबत थोडीच येणार आहे?