________________
१३४
क्लेश रहित जीवन
म्हणतो. बायकोचा मार खातो आणि बाहेर सांगतो, छे, छे, ती तर मुलीला मारत होती! अरे पण मी स्वतः तुला मार खाताना पाहिले ना? याचा काय अर्थ ? मिनिंगलेस. त्याऐवजी खरे-खरे सांगून टाक की! आत्म्याला थोडेच कुणी मारणार आहे? आपण आत्मा आहोत, मारेल तर शरीराला मारेल. आत्म्याचा तर कुणी अपमानही करू शकणार नाही. कारण ती आपल्याला (आत्म्याला) बघू शकली तरच अपमान करेल ना? बघितल्याशिवाय कसा अपमान करेल? या देहाला तर म्हैस सुद्धा मारते. तेव्हा तुम्ही सांगताच ना की, या म्हशीने मला मारले? म्हशीपेक्षा बायको मोठी नाही का? मग त्यात काय? त्यात कुठे अब्रू जाणार आहे ? मुळात अब्रू आहेच कुठे? या जगात किती जीव राहतात? कोणी कपडे घातले का? अब्रूदार कपडे घालतच नाही. ज्याला अब्रू नाही तेच कपडे घालून अब्रू झाकत फिरतात, (कपडे) फाटले तर शिवत बसतात. कोणी बघितले तर, कोणी बघितले तर! अरे, शिवन-शिवून किती दिवस अब्र झाकशील? शिवलेली अब्रू टिकत नाही. अब्रू तर जिथे नीति आहे, प्रामाणिकता आहे, दयाभाव आहे, जिव्हाळा आहे, परोपकारी स्वभाव आहे तिथे आहे.
फसवणूक अशी वाढत गेली या भाजी आणि भाकरीसाठी लग्न केले. नवऱ्याला वाटते की मी पैसे कमावून आणेल पण स्वयंपाक कोण बनवेल? बायकोला वाटते की मी स्वयंपाक बनवेल पण पैसे कोण कमवेल? असा विचार करून दोघांनी लग्न केले आणि सहकारी मंडळ उभे केले. नंतर मुलेही होणार. दुधीचे एक बी पेरले मग त्यावर दुध्या येणार की नाही? वेलीच्या पानापानांवर दुध्या येतील. अशाप्रकारे ही माणसेदेखील दुधीसारखे उगवत राहतात. दुधीची वेल अशी म्हणत नाही की या माझ्या दुधी आहेत. फक्त ही मनुष्य जातच असे बोलते की, ही माझी मुले आहेत. हा बुद्धीचा दुरुपयोग केला, ही मनुष्य जाती बुद्धीवर अवलंबून राहिली म्हणून निराश्रित म्हटली गेली. इतर कुठलाही जीव बुद्धीवर अवलंबून नाही.