________________
क्लेश रहित जीवन
त्यासाठी रडबोंबल करायची नसते. हा संसार अनिवार्य आहे ! घरात बायकोचा भांडखोर स्वभाव आवडत नसेल, मोठ्या भावाचा स्वभाव आवडत नसेल, दुसरीकडे वडिलांचा स्वभाव पसंत नसेल, अशा टोळीत माणूस फसला असेल तरीही त्याला तिथे राहावे लागते. मग जाणार कुठे ? अशा फसवणूकीचा कंटाळा येतो, पण जाणार कुठे ? चारही बाजूंनी कुंपण आहे. समाजाच्या मर्यादा असतात, 'समाज मला काय म्हणेल ? सरकारच्याही मर्यादा असतात. जर कंटाळून जलसमाधी घ्यायला जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो तर पोलीसवाला पकडतो. 'अरे बाबा, मला आत्महत्या करू दे, निवांतपणे मरू दे !' तेव्हा तो म्हणेल 'नाही. मरू पण देणार नाही. तू इथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हा गुन्हा केला म्हणून आम्ही तुला तुरुंगात टाकणार आहोत !' धड जगूही देत नाहीत आणि धड मरूही देत नाहीत, यालाच म्हणतात संसार ! म्हणून रहा ना आरामात...शांतपणे झोपाना! असे हे अनिवार्य जग! मरूही देत नाही आणि जगूही देत नाही.
१३२
कसेही करुन, एडजस्ट होऊन, वेळ निभावा, म्हणजे उधारी चुकती होईल. कुणाचे पंचवीस वर्षाचे, कुणाचे पंधरा वर्षांचे, कुणाचे तीस वर्षाचे, नाईलाजाने का होईना कर्ज चुकवावेच लागते. इच्छा नसेल तरीही त्याच खोलीत एकत्र रहावे लागते. इथे भाऊसाहेबांचे अंथरून आणि तिथे बाईसाहेबांचे अंथरून! बाईसाहेब तोंड फिरवून झोपल्या तरी मनात भाऊसाहेबांचेच विचार चालू असतात ना! सुटकाच नाही. हे जगच असे आहे. आणि त्यातही फक्त नवऱ्यालाच बायको आवडत नाही असे नाही, तर बायकोलाही नवरा आवडत नसतो ! म्हणून यात सुख घेण्यासारखे नाहीच.
विचारवंत माणसाला तर संसाराची झंझट आवडणारच नाही. जे विचारवंत नाहीत त्यांना तर संसार ही तर एक झंझट आहे हेच समजत नाही. जसे एखाद्या बहिऱ्या माणसासमोर आपण कितीही खाजगी गोष्टी केल्या तर त्यात काही अडचण आहे का ? तसेच आत सुद्धा बहिरेपणा