________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१३१
पुरुषाशिवाय कुणालाही जमणार नाही. पोपट मस्ती करतात तेव्हा आपल्याला भीती वाटते की, आता हे दोघेही मरतील, पण ते काही मरत नाहीत. ते फक्त वरवर चोची मारत राहतात, कोणाला इजा होणार नाही अशा चोची मारतात.
____ आम्ही वाणीला रेकॉर्ड म्हटले आहे ना? रेकॉर्ड वाजत असेल की 'चंदुला अक्कल नाही, चंदुला अक्कल नाही.' मग तुम्ही पण म्हणायला लागा की 'चंदुला अक्कल नाही.'
___ममतेचे वेढे उलगडावे कसे? दिवसभर काम करत असतानाही नवऱ्याचे प्रतिक्रमण करीत राहावे. एका दिवसात सहा महिन्यांचे केलेले वैर (शत्रुत्व) संपेल आणि जरी अर्धा दिवस झाले तरीही तीन महिन्यांचे तरी कमी होईल! लग्नापूर्वी नवऱ्यावर ममता होती का? नाही. मग ममता कधीपासून जडली. लग्नाच्या वेळी मंडपात समोरासमोर बसले तेव्हा आता माझा नवरा आला, असे तिने ठरवले. थोडे जाड आहेत, थोडे सावळे आहेत. आणि त्याचवेळी नवऱ्यानेही ठाम ठरवले की ही माझी बायको आहे. तेव्हापासून हे चक्र सुरु झाले. 'माझे आहे, माझे आहे' असा जो पीळ मारला आणि नंतर ते पीळ वाढतच जातात. ही पंधरा वर्षांची फिल्म कशी उलट फिरवायची? तर 'हे माझे नाहीत,' हे माझे नाहीत' असे म्हणत राहिले तर हा पीळ सुटत जातो आणि ममता कमी होत जाते. हे तर लग्न झाल्यापासून असे अभिप्राय तयार झाले, प्रेज्युडीस (पूर्वग्रह) धरले गेले की 'हे असेच आहेत, हे तसेच आहेत.' लग्नापूर्वी असे काही होते का? आता तुम्ही मनात पक्के करा की, 'जे आहे ते हे असेच आहे.' आपणच त्यांना पसंत केलेले आहे. आता काय नवरा बदलता येईल?
सगळीकडेच फसवणूक! कुठे जावे? ज्याचा उपाय नाही त्याला काय म्हणाल? ज्याचा उपाय नाही